नवी दिल्लीः Samsung Galaxy A22 5Gची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. DealNTech च्या एका रिपोर्टनुसार, या अपकमिंग स्मार्टफोनला एका युरोपियन रिटेलरच्या वेबसाइटवर पाहिले गेले आहे. वेबसाइट लिस्टिंगमध्ये फोनच्या ६४ जीबी व्हेरियंटची किंमत १८५ यूरो म्हणजेच १६ हजार ५०० रुपये आहे. रिपोर्टमध्ये हेही म्हटले आहे की, टॅक्स सोबत या फोनची किंमत १९९ यूरो म्हणजेच १७ हजार ८०० रुपये होईल. लिस्टिंगमध्ये फोनच्या फीचर्सच्या संबंधी कोणतीही माहिती दिली नाही. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी A22 5G मिळू शकतात हे फीचर्स सॅमसंगच्या या अपकमिंग स्मार्टफोनचे फीचर्स आधीच्या काही लीक्समध्ये उल्लेख केला होता. या लीक्सच्या माहितीनुसार, या फोनमध्ये कंपनी ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले ऑफर करू शकते. कंपनी या स्मार्टफोनमध्ये कमीत कमी ४ जीबी रॅ आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येऊ शकते. या फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंसिटी 700 SoC दिला जाऊ शकतो. या महिन्याच्या सुरुवातीला या फोनमध्ये काही रेंडर समोर आले होते. यात दाखवले होते की, फोनमध्ये डिस्प्लेत सेल्फी कॅमेरासाठी नॉच दिला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरच्या या फोनमध्ये रियर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. वाचाः फोनचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा असू शकतो. याशिवाय, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. या फोनमध्ये १५ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. या फोनला ग्रे, लाइट ग्रीन, पर्पल आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये लाँच केले जाऊ शकते. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Telr5D