नवी दिल्लीः जर तुम्हाला मोबाइल टॉवर लावण्यासाठी मेसेज किंवा कॉल किंवा ई-मेल आल्यास तुम्ही अलर्ट राहा, अशी सूचना टेलिकॉम सर्विस प्रोवाइडर्स आणि टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवाइडरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या COAI आणि TAIPA ने नागरिकांना दिली आहे. हा एक फ्रॉड असू शकतो, असेही यावेळी म्हटले आहे. COAI आणि TAIPA ने लोकांना सावध करताना काही कंपन्या, एजन्सी आणि व्यक्ती लोकांची फसवणूक करीत आहेत असे म्हटले आहे. वाचाः मोबाइल टॉवर लावण्यासाठी त्यांना किंवा परिसरातील लोकांना लीजवर देण्यासाठी टॅक्सच्या नावाने आपल्या व्यक्तीगत किंवा कंपनीच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले जात आहे. हे लोक टॉवर लावण्यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सुद्धा देतात. अशा लोकांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. मोबाइल टॉवर लावण्याचे काम टेलिकॉम सर्विस प्रोवाइडर्स (TSP) किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवाइडर्स (आयपी) यांच्याकडून केले जाते. त्यामुळे लोकांना आवाहन करण्यात आले की, कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याआधी टीएसपी किंवा आयपीच्या वेबसाइटवर जाऊन त्याची पडताळणी करा. याची सविस्तर माहिती www.dot.gov.in वर सुद्धा उपलब्ध आहे. वाचाः COAI चे DGP लेफ्टिनेंट जनरल डॉक्टर एसपी कोच्चर ने म्हटले की, टेलीकॉम इंडस्ट्री आपल्या ग्राहकांना सर्वश्रेष्ठ सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहेत. मोबाइल टॉवर एअरटेल, रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडिया सारख्या टेलिकॉम सेवा किंवा अधिकृत टेलीकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सेवा दिली जाते. त्यामुळे ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे की, कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन इंस्टालेशचा प्रस्ताव घेऊन त्याच्या विश्वासार्हतेचा तपास करावा. वाचाः TAIPA च्या डीजी टी आर दुआ ने म्हटले की, मोबाइल टावर्स टेलीकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या इंड्स टॉवर्स, अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशन, समिट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, एस्सेंड टेलीकॉम, टॉवर विज़न, कॉसलाइट इंडिया टेलीकॉम प्रायवेट लिमिटेड, स्टरलाइट टेक्नोलॉजीज लिमिटेड, स्पेस वर्ल्ड, सुयोग टेलीमेटिक्स, आयबस नेटवर्क्स आणि एप्लाईड सोलर टेक्नोलॉजीज यांच्याकडून टॉवर्स लावले जातात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. याप्रकरणी जास्त माहिती मिळवायची असल्यास राष्ट्रीय कंज्यूमर हेल्पलाइन नंबर 14404 किंवा 1800114000 वर कॉल करू शकता. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f0ftNg