Full Width(True/False)

गावा-गावात पोहोचणार 5G इंटरनेट, जाणून घ्या मोदी सरकारचा मास्टर प्लान

नवी दिल्लीः डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन (DoT) आता नेटवर्क प्रोव्हाइडर कंपन्यांना शहरासह गावात सुद्धा ५ जी इंटरनेट टेस्टिंग करण्याचा सल्ला देऊ शकते. डिपार्टमेंटने देशाची दिग्गज नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी Airtel, Reliance JIO आणि Vodafone Idea ला संपूर्ण देशात ५जी इंटरनेटर टेस्टिंगसाठी ६ महिन्यांची वेळ दिली आहे. मीडिया सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या मालकी असलेल्या नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी MTNL ५ हजार रुपये जमा करून ५ जी टेस्टिंगची मंजुरी घेऊ शकते. यानंतर कंपनीला टेस्टिंगसाठी स्पेक्ट्र्म मिळणार आहे. वाचाः दिल्लीच्या नझफगडमध्ये टेस्टिंग केली जाणार डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन (DoT) नेटवर्क प्रोवाइडर कंपन्यांना शहरात आणि गावात दोन्ही ठिकाणी ५जी इंटरनेट टेस्टिंगसाठी सांगितले जाईल. MTNL ने दिल्ली मध्ये 5G इंटरनेट टेस्टिंग साठी C-DoT सोबत पार्टनरशिप केली आहे. दिल्लीच्या नझफगड मध्ये टेस्टिंग केली जाणार आहे. ५ हजार रुपये जमा केल्यानंतर टेस्टिंगसाठी स्पेक्ट्रम मिळणार आहे. नेटवर्क प्रोव्हाइडरला भारतात अनेक ठिकाणी ७०० मेगाहर्ट्ज बँड, ३.३-३.६ गीगाहर्ट्ज बँड आणि २४.२५--२८.५ गीगाहर्ट्ज बँडमध्ये टेस्टिंगला मंजुरी मिळणार आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन ने Ericsson, Nokia, Samsung आणि C-DoT ला 5G टेस्टिंग ला मंजुरी मिळाली आहे. सध्या चीनच्या कंपन्यांना टेक्नोलॉजीला मंजुरी दिली नाही. वाचाः भारतात या जागी होणार 5G टेस्टिंग सोर्सवरून माहिती होत आहे, जिओ ५जी इंटरनेट टेस्टिंगसाठी आपल्या टेक्नोलॉजी सोबत सॅमसंगचे नेटवर्क डिव्हाइस युज करणार आहे. सध्या जिओ किंवा सॅमसंगकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. भारतात ५जीची टेस्टिंग मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, गुजरात, हैदराबाद आणि कोलकाता मध्ये केली जाणार आहे. एअरटेल मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बेंगळुरू मध्ये टेस्टिंग करणार आहे. जिओ मुंबई, गुजरात, हैदराबाद आणि दिल्लीत टेस्टिंग करणार आहे. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनच्या माहितीनुसार, ५ जी टेक्नोलॉजी ४ जी च्या तुलनेत जास्त चांगली डाउनलोड स्पीड देईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Rf06bS