नवी दिल्ली : हा दमदार लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्स वेबसाइट च्या मायक्रो वेबसाइटवर हे कन्फर्म करण्यात आले आहे. Amazon वर iQoo Z3 साठी एक मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे, जेथे फोनसंदर्भात माहिती उपलब्ध आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 768G SoC प्रोसेसर सोबत येणारा हा भारतातील पहिला फोन असेल, असे सांगितले जात आहे. फोनची Amazon वरून विक्री केली जाण्याची शक्यता आहे. सध्या मायक्रोसासाइटवर Notify Me बटन देण्यात आले आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेऊया. वाचाः 5G ची वैशिष्ट्ये Amazon वर iQoo Z3 च्या मायक्रोसाइटनुसार, फोनच्या फ्लॅश चार्ज तंत्रज्ञानाबद्दल आज माहिती दिली जाईल. तर २ जूनला फोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती दिली जाईल. त्यानंतर ३ जूनला गेमिंग एक्सपिरियंस आणि ४ जूनला फोनच्या डिस्प्ले आणि डिझाइनबद्दल माहिती मिळेल. फोनला भारतीय बाजारात कधी लाँच केले जाईल याची माहिती नाही. या फोनचा AnTuTu स्कोर ४५ हजारांपेक्षा जास्त आहे. यात ३ जीबी एक्सटेंडे रॅमचा पर्याय मिळेल. प्रोसेसरची तुलना करायची तर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 768G SoC चा AnTuTu स्कोर ४.५ लाखांपेक्षा अधिक आहे. स्नॅपड्रॅगन 750G SoC चाAnTuTu स्कोर ३.८१ लाखांपेक्षा अधिक आहे. तर स्नॅपड्रॅगन 732G SoC चा AnTuTu स्कोर ३.६३ लाखांपेक्षा अधिक आहे. वाचाः मोफत मिळू शकतो iQoo Z3 5G: यासाठी तुम्हाला Amazon वर iQoo Z3 च्या मायक्रोसाइटवरील Notify Me वर क्लिक करावे लागेल. फोनच्या टीझर पोस्टचा स्क्रिनशॉट घ्यावा लागेल. या स्क्रिनशॉटला साथ #iQOOZ3 #iQOOZ3Contest हॅशटॅगसोबत ट्विट करावे लागेल. सोबतच, @iqooInd, @amazonIN ला फॉलो करावे लागेल. असे करणाऱ्या ३ लकी विजेत्यांना मोफत iQoo Z3 5G दिला जाईल. iQoo Z3 5G चे फीचर्स: iQoo Z3 5G ला चीनच्या बाजारात मार्च महिन्यात लँच करण्यात आले आहे. फोन iQoo १.० च्या OriginOS वर आधारित अँड्राइड ११ वर काम करतो. यात ६.५८ इंच फूल एचडी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे पिक्सल रिझॉल्यूशन १०८०x२४०८ आहे. हा फोन ऑक्टो कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 768G प्रोसेसरसोबत येतो. यात एड्रेनो ६२० जीपीयू देण्यात आला आहे. तसेच, यात ८ जीबी स्टोरेज आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने १ टीबीपर्यंत वाढवता येईल. iQoo Z3 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचे प्रायमरी सेंसर ६४ मेगापिक्सल असून, याचा अपर्चर f/१.७९ आहे. दुसरा सेंसर ८ मेगापिक्सल असून, ज्याचे अपर्चर f/२.२ आहे. तर तिसरा २ मेगापिक्सलचा सेंसर आहे, ज्याचे अपर्चर f/२.४ आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. यात ५५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ५G, ड्युल बँड वाय-फाय, ब्लूटूथ v५.१, जीपीएस, ३.५mm हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी सारखे फीचर्स मिळतील. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fD8riV