Full Width(True/False)

Google Photos : मोफत अनलिमिटेड स्टोरजची सुविधा समाप्त, ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवू शकता स्पेस

नवी दिल्ली : आजपासून स्टोरेजची मोफत सुविधा समाप्त होत आहे. नवीन नियमांनुसार अकाउंट उघडल्यावर जे १५ जीबी मोफत स्टोरेज मिळेल, त्यातच Photos च्या स्टोरेजचा समावेश असेल. आता तुम्हाला Google Photos साठी स्टोरेज मॅनेजमेंट व्यवस्थित करावे लागणार आहे. कंपनीने यासाठी स्बस्क्रिप्शन सुविधा देखील सुरू केली आहे. मात्र, अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी तुम्ही काही ट्रिक्स वापरून १ जूननंतर देखील Google Photos मोफत वापरू शकता. वाचाः Auto बॅकअप बंद करा फोटोच्या ऑटो बॅकअपला तुम्ही बंद करू शकता. यात , टेलिग्राम सारख्या अ‍ॅप्सचे देखील गुगलवर स्टोर होतात, ते बंद करावेत. तुम्ही स्वतः महिन्यातून एकदा कोणते फोटो बॅकअप करायचे, कोणते नाही ते निवडू शकता. अनावश्यक फाइल डिलीट करा तुमच्या फोनमध्ये अनावश्यक मेल्स असतील तर ते त्वरित डिलीट करा. आता जीमेलसाठी मिळणारे १५ जीबी स्टोरेज गुगल फोटोजसाठी देखील शेअर करावे लागेल. अशात जे डॉक्यूमेंट्स, मेल कामाचे नाहीत त्यांना त्वरित डिलीट करावे. यामुळे तुमचे स्टोरेज वाचेल. वाचाः Gmail स्पॅम रिकामे करा. Gmail वर अनेक प्रकारचे मेल्स येत असतात. यात स्पॅम मेल्सचा देखील समावेश असतो. स्पॅम मेल्स येत असल्याने स्टोरेज भरते. त्यामुळे Gmail स्पॅम मेल्स क्लियर करावे. यातून तुम्ही २-३ जीबी स्टोरेज वाचवू शकता. Google Drive देखील जास्त स्टोरेज खाते. त्यामुळे Google Drive ला एकदा तपासा. जर तुम्ही मोठ्या साइजच्या फाइल यात ठेवल्या असतील, अशा अनावश्यक फाइल्सला डिलीट करा. अस्पष्ट आणि डुप्लिकेट Photo हटवा Google Photo लायब्रेरीमध्ये अनावश्यक, खराब, डुप्लिकेट फोटो असतील तर ते तपासून त्वरित डिलीट करा. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34B4TqY