Full Width(True/False)

व्हिडिओ कॉल सपोर्ट सोबत शाओमीची छोट्या मुलांसाठी खास स्मार्टवॉच लाँच

नवी दिल्लीः 4G Phone Watch 5C price Features: Xiaomi ने छोट्या मुलांसाठी एक शानदार स्मार्टवॉच MITU Children 4G Phone Watch 5C लाँच केली आहे. जी सेफ्टी आणि फीचर्ससाठी खूपच जबरदस्त आहे. शाओमीची चिल्ड्रेन स्मार्टवॉचला ४जी कनेक्टिविटीसोबत आणले गेले आहे. म्हणजेच तुम्ही यात सिम टाकू शकता. मीतू चिल्ड्रेन ४जी फोन वॉच ५सी ला व्हिडिओ कॉल सपोर्ट सोबत लाँच केले आहे. यामुळे मुलांना तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कॉल करू शकता. शाओमीच्या या स्मार्टवॉचला चीनमध्ये ३७९ युआन म्हणजेच ४३११ रुपयांत लाँच केले आहे. या स्मार्टवॉचला लवकरच भारतात लाँच केले जाऊ शकते. वाचाः स्पोर्टी लूकची स्मार्टवॉच Xiaomi MITU Children 4G Phone Watch 5C मध्ये लोकेशन ट्रॅकिंग फीचर दिले आहे. याच्या मदतीने आपल्या मुलांची मूव्हमेंट किंवा लोकेशन संबंधी माहिती करू शकता. दिसायला स्पोर्टी लूक असलेल्या या स्मार्टवॉचमध्ये XiaoAI व्हाइस असिस्टेंस फीचर दिले आहे. हे खूपच आवश्यक फीचर आहे. कंपनीने याला २० मीटर अंडरवॉटर पर्यंत रजिस्टेंस फीचर सोबत लाँच केले आहे. मुलांसाठी खास तयार करण्यात आली आहे. स्मार्टवॉच मध्ये अल्ट्रावाइड अँगलचा कॅमेरा दिला आहे. याचा फायदा तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग करताना होतो. वाचाः तुमचा मुलगा कुठे आहे आणि काय करतो आहे Xiaomi च्या या चिल्ड्रेन स्मार्टवॉच मध्ये 1.4 इंचाच्या कलरचा डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टवॉच मध्ये 900mAh ची बॅटरी दिली आहे. Xiaomi MITU Children 4G Phone Watch 5C मध्ये असे काही फीचर्स दिले आहेत. याच्या मदतीने तुम्ही मुलांच्या अॅक्टिविटी ट्रॅक करू शकता. स्मार्टवॉच मध्ये मुलांच्या स्केड्यूल सुद्धा ट्रॅक करू शकता. स्मार्टवॉच मध्ये तुम्ही मुलाच्या लर्निंग संबंधित अॅप सुद्धा डाउनलोड करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d4p7hz