Full Width(True/False)

‘या’ २० वर्षीय मुलीने मायक्रोसॉफ्टमध्ये शोधली मोठी त्रुटी, मिळाले तब्बल २२ लाखांचे बक्षीस

नवी दिल्ली : 20 वर्षीय सायबर सिक्योरिटी अ‍ॅनालिस्ट आदिती सिंहला मायक्रोसॉफ्टकडून तब्बल ३० हजार डॉलर्सचे (जवळपास २२ लाख रुपये) बक्षीस देण्यात आले आहे. आदितीने मायक्रोसॉफ्टची क्लाउड सिस्टम मध्ये त्रुटी शोधल्यामुळे तिला बाउंटी स्वरूपात ही रक्कम मिळाली आहे. आपल्या पालकांना देखील याबाबत अभिमान वाटत असून, मुलगी अखेर सेटल झाली असे त्यांना वाटत असल्याची भावना आदितीने बोलून दाखवली. वाचा : आदितीला मायक्रोसॉफ्टच्या Azure या क्लाउड प्लॅटफॉर्मवर Remote Code Execution बग सापडले आहे. या बगसंदर्भातील माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. अशा प्रकारे त्रुटी शोधून पैसे मिळवण्याचा भारतातील अनेक सायबर सिक्युरिटी एक्सपर्टसाठी एक चांगले करिअर झाले आहे. अनेकांप्रमाणेच आदितीने देखील १०वी नंतर आयआयटी आणि मेडिकलच्या तयारीसाठी कोटाचा मार्ग धरला. मात्र, या स्पर्धा परीक्षेत आपण मागे पडू, याची तिला जाणीव झाली. आदितीने सांगितले की, ‘मेडिकलची तयारी करण्यासाठी ती कोटामध्ये Allen institute ला जॉइंड झाली. तिला याआधी कॉम्प्यूटर सायन्सबाबत कोणतीही माहिती नव्हती. तसेच, बग बाउंटी हंटिंगमध्ये सहभाग घेऊन तिला केवळ एक वर्षच झाले आहेत.’ शाळेनंतर तिने इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटीमध्ये बीसीएसाठी अडमिशन घेतले. सोबतच मध्ये ती सायबर सिक्योरिटी अ‍ॅनालिस्ट म्हणून देखील काम करत आहे. याबाबत बोलताना तिने सांगितले की, ‘मी Javascript, MySQL आणि इतर प्रोग्रामिंग लँग्वेज गुगल आणि यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून शिकले. मला बग बाउंटीमध्ये रस होता व ते कसे रिपोर्ट करायचे हे देखील शिकले.’ हे शिकण्यासाठी जवळपास १ वर्ष लागल्याचे देखील ती सांगते. वाचा : आदिती पुढे म्हणाले की, अनेक प्लॅटफॉर्म सर्च केल्यानंतर अखेर MapMyIndia मध्ये काही त्रुटी आढळल्या. मी त्यांच्यापर्यंत पोहचले व डिग्री नसतानाही नोकरी मिळवण्यास यश मिळाले. प्रोग्रामिंग आणि सायबर सिक्योरिटीबाबत शिकण्यासाठी कॉम्प्यूटर सायन्सची डिग्रीच असायला हवी, असा विचार करणे वेडेपणा असल्याचेही तिला वाटते. शिकण्यासारख्या अनेक गोष्टी ऑनलाइन मोफत उपलब्ध आहेत. ‘बग बाउंटीसाठी तुम्ही आयआयटीमधून आलेले असणे गरजेचे नाही. तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केले तर ते खूपच सोपे आहे. जर एखाद्याला एथिकल हॅकिंग शिकायचे असेल तर Javascript आणि Python पासून सुरूवात करावी व त्यानंतर यामध्ये सर्टिफिकिट कोर्स करावा.’, असेही म्हणाली. वाचा : वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jqANPt