Full Width(True/False)

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत रिलेशनशिपमध्ये? अलाया फर्निचरवालाचा खुलासा

मुंबई: 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या स्टायलिश कपड्यांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. कारणंही तसंच आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अलायाचं नाव शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरेसोबत जोडलं जात आहे. अलाया आणि यांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये खास नातं असल्याच्या चर्चा होत असतात. याच संदर्भात अलायानं नुकातच खुलासा केला आहे. आमच्या दोघांमध्ये केवळ चांगली मैत्री असल्याचं अलायनं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अलायानं तिच्या रिलेशनशीपवर भाष्य केलं. ऐश्वर्य ठाकरेसोबत नात्यात असलेल्या चर्चांनाही पूर्णविराम दिलाय. आता मी या चर्चेकडे फार लक्ष देत नाही. ऐश्वर्य माझा खूप चांगला मित्र आहे. तो खूप हुशार आहे. आमच्या दोघांबद्दल नेहमीच चर्चा सुरू असतात.त्यामुळे आमच्या घरच्यांनाही याची सवय झाली आहे', असं अलायनं म्हटलं आहे. स्मिता ठाकरेंनी शेअर केला होता खास व्हिडिओऐश्वर्य ठाकरेची आई स्मिता ठाकरे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यात तो केक कापताना दिसत आहे. त्यात अलाया दिसत नसली तरी स्मिताने हॅशटॅगमध्ये अलाया तिथे उपस्थित असल्याचं म्हटलं. ऐश्वर्यने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये आई आणि आलाया दोघींनाही टॅग केलं होतं. हुरळून जाणार नाहीपदार्पणाच्या सिनेमातच झालं की कलाकार भारावून जातात. पण, अलाया फर्निचरवाला त्याला अपवाद ठरली आहे. ' ' या चित्रपटातल्या तिच्या कामाचं सिनेसृष्टीतून कौतुक झालं होतं. ती म्हणते, 'माझं काम सगळ्यांना आवडतंय याचा मला आनंदच आहे. पण, यामुळे मी बिलकूल हुरळून जाणार नाही. उलट हे कौतुक मला अधिकाधिक चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देत राहिल.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2UcoJXO