Full Width(True/False)

नवीन लॅपटॉप खरेदी करताना 'या' टिप्स उपयोगी पडतील, पश्चातापाची वेळ येणार नाही

नवी दिल्लीः : करोना काळात खूप सारे बदलले आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे मुलांचे ऑनलाइन क्सासेस पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. आता या दोन्ही कामांसाठी एका चांगल्या लॅपटॉपची गरज आहे. ऑनलाइन क्लास असो की, वर्क फ्रॉम होम साठी नवीन लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमत जर तुम्हाला कोणताही विंडो लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर याची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी. कारण, शाळा, कॉलेजच्या कामासाठी लॅपटॉपवर ५० हजारांपेक्षा जास्त पैसे खर्च करणे हे चांगले लक्षण नाही. सध्या एचपी, डेल, आसुससह अनेक ब्रँड्स आहेत जे कमी किंमतीत चांगले लॅपटॉप्स देत आहेत. असा असावा प्रोसेसर सध्या मार्केटमध्ये Intel Core i3 लॅपटॉप उपलब्ध आहे. परंतु, Intel Core i5 प्रोसेसरचा लॅपटॉप खरेदी करा. याचा जबरदस्त परफॉर्मन्स तुमच्या ऑफिस आणि दुसरे कामे सोपे करेल. इतकी असावी रॅम लॅपटॉपमध्ये कमीत कमी ८ जीबी रॅम असायला हवी. कारण, यापेक्षा जास्त असेल तर बेस्टच आहे. विद्यार्थ्यांसाठी ८ जीबी रॅमचे लॅपटॉप परफेक्ट आहेत. ४ जीबी रॅमचे लॅपटॉप स्लो काम करतात. त्यामुळे तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. Hard Drive वरही लक्ष ठेवा नवीन लॅपटॉप खरेदी करताना याचा हार्ट ड्राइव्ह ५१२ जीबी पर्यंत असायला हवा. विद्यार्थ्यांसाठी लेक्चरर किंवा नोट्स डाउनलोड करताना जास्त स्पेसची गरज असते. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा. बेस्ट अँटी व्हायरस खरेदी लॅपटॉप खरेदी करताना पॉवरफुल अँटी व्हायरस सोल्यूशन अवश्य पाहा. हे अँटी व्हायरस तुमच्या लॅपटॉपला हॅकर्स पासून सुरक्षित ठेवतील. एका नवीन लॅपटॉपसाठी एक चांगले अँटी व्हायरस असणे खूपच गरजेचे आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gZrgvV