Full Width(True/False)

आशा भोसले यांनी विवियन रिचर्ड्सनां दिलेली नाना पाटेकरांची उपमा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यांचे 'सच कहूं तो' हे आत्मचरित्र सध्या खूपच गाजते आहे. आत्मचरित्रामध्ये नीना यांनी आपल्या सिने करिअरबद्दल तर लिहिले आहेच, शिवाय आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या आहेत. त्यामध्ये विविय रिचर्ड्स यांच्यासोबतचे प्रेम, लग्न, मुलगी मसाबाचा जन्म या साऱ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. याशिवाय नीना गुप्ता, विवियन आणि यांच्या भेटीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी विवियन यांची तुलना यांच्याशी केली आहे. त्यावर नीना गुप्ता यांनी आशा भोसलेंना मजेशीर उत्तर दिले आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडधील एका कार्यक्रमात आशा भोसले सहभागी झाल्या आहेत. आशा भोसले यांच्यासोबत बॉलिवूडमधील इतर अनेक दिग्गज कलाकार ही दिसत आहेत. थोड्यावेळानंतर नीना गुप्ता त्या कार्यक्रमाला विवियन यांच्यासोबत येतात. त्यानंतर ते दोघे आशा भोसले यांच्या बाजूला येऊन बसतात आणि ते तिघे गप्पा मारू लागतात. या गप्पांमध्ये आशा भोसले, नीना यांना म्हणतात की विवियन हे अगदी नाना पाटेकर यांच्यासारखे दिसतात. आशाताईंच्या या वक्तव्यावर नीना सहमत होत नाहीत आणि त्या म्हणतात,' विवियन त्यांच्यापेक्षा जास्त चांगले दिसतात...' काही वेळानंतर विवियन यांना नीना म्हणतात, 'आमच्याकडे नाना पाटेकर नावाचे एक अभिनेते आहेत. आशाजी म्हणतात तुम्ही त्यांच्यासारखे दिसतात.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3js1x29