Full Width(True/False)

पॉवरफुल स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा हा स्मार्टफोन दिवाळीआधी भारतात लाँच होणार, पाहा किंमत

नवी दिल्लीः टेक कंपनी Realme ने नुकतेच स्मार्टफोनला यूरोपमध्ये आणले होते. आता कंपनीचे सीईओ माधव शेठ यांनी #AskMadhav च्या २७ व्या एपिसोड मध्ये कन्फर्म केले आहे की, या फोनला दिवाळी आधी भारतात लाँच केले जाणार आहे. परंतु, कंपनीकडून अद्याप या फोनच्या लाँचिंगची तारीख कन्फर्म करण्यात आली नाही. वाचाः Realme GT 5G ची भारतातील संभावित किंमत Realme GT 5G स्मार्टफोनला यूरोपमध्ये सुरुवातीची किंमत ४४९ यूरो (३९ हजार ५०० रुपये) आहे. या किंमतीत 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडलची आहे. या फोनला Dashing Silver, Dashing Blue आणि Racing Yellow कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्टफोनची किंमत भारतात ४० हजार ते ५० हजार रुपये या दरम्यान असू शकते, असे बोलले जात आहे. वाचाः Realme GT 5G ची फीचर्स Realme GT 5G स्मार्टफोन मध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि 120Hz चा रिफ्रेश रेट आहे. सोबत यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. सोबत फोनमध्ये Snapdragon 888 प्रोसेसर, 12GB रॅम आणि 256GB चे इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. हा फोन अँड्रॉयड ११ वर आधारित Realme UI 2.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. वाचाः फोनचा कॅमेरा फोटोग्राफीसाठी कंपनीने Realme GT 5G स्मार्टफोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 64MP चा प्रायमरी सेंसर, 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP चा मायक्रो लेन्स उपलब्ध आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये फ्रंटला 16MP चा कॅमेरा दिला आहे. वाचाः बॅटरी आणि कनेक्टिविटी Realme GT 5G स्मार्टफोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 65 वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट देते. याशिवाय, फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी वाय फाय, ब्लूटूथ, जीपीएस, एसएफसी, हेडफोन जॅक आणि यूसबी टाइप सी पोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iTsRGc