Full Width(True/False)

सावधान! व्यवहार न करता OTP आल्यास होईल मोठे नुकसान, वाचण्यासाठी वापरा या टिप्स

नवी दिल्ली : लोकांची फसवणुक करण्यासाठी नववीन पद्धती शोधत आहे. अनेक मोबाइलमधील डेटा चोरी होऊन बँक खात्यातील रक्कम उडवली जाते. ऑनलाइन बँकिंगच्या वाढत्या सुविधेसोबतच देखील हायटेक झाले आहेत. अनेकदा तुम्हाला कोणतेही ट्रांझॅक्शन न करताही येतो. मात्र, आपण याकडे बँकेची चूक म्हणून दुर्लक्ष करतो. परंतु, यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. या प्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी काय करायला हवे, ते जाणून घेऊया. वाचाः एक गोष्ट लक्षात ठेवा की, जर तुम्ही कोणताही ऑनलाइन व्यवहार केला नसले तर फोन नंबरवर ओटीपी येणार नाही. मात्र, विना ट्रांझॅक्शन ओटीपी येत असेल तर सतर्क होणे गरजेचे आहे. जर असे झाले तर सायबर गुन्हेगाराकडे तुमच्या बँकेची सर्व माहिती आहे, हे समजून जा. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी वेळोवेळी आपल्या बँकेला मोबाइल नंबर व इतर माहिती द्यावी. जर तुम्ही मोबाइल नंबर बदलला असेल तर त्वरित याबाबत बँकेला माहिती द्यावी. याशिवाय एक-दोन आठवड्यांनी क्रेडिट कार्ड अकाउंटची माहिती देखील तपासावी. वाचाः जर तुमच्या फोन नंबर अथवा ई-मेल आयडीवर कोणत्याही प्रकारची संशयास्पद लिंक आल्यास त्यावर क्लिक करणे टाळा. जर चुकीने क्लिक केले तर त्यामध्ये खासगी माहिती देणे टाळावे. जर तुम्ही माहिती दिली तर मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, इंटरनेट बँकिंग आयडी सहज हॅकर्सपर्यंत पोहचते. इंटरनेट बँकिंग अथवा कोणत्याही आर्थिक व्यवहारासंबंधित खात्यासाठी अवघड वापरा व वेळोवेळी त्यात बदल करा. वाढदिवस, लग्नाची तारीख, मोबाइल-गाडीचा नंबर पासवर्ड म्हणून ठेवू नये. सर्वगोष्टींची काळजी घेतल्यानंतर देखील फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस, स्थानिक पोलीस आणि बँकेला माहिती द्यावी. जेवढ्या लवकर तक्रार कराल, तेवढ्या लवकर पैसे परत मिळतील. याशिवाय फोनमध्ये पेड अँटी व्हायरसचा देखील वापर करावा. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TMQgi2