Full Width(True/False)

एलॉन मस्क थेट सेटेलाइटद्वारे जगभरात पुरवणार इंटरनेट सेवा, ‘या’ महिन्यात सुरू होत आहे सर्व्हिस

नवी दिल्ली : टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ यांची कंपनी लवकरच जगभरात सुरू करणार आहे. सेटेलाइट आधारित ब्रॉडबँड सेवा ऑगस्ट महिन्यापासून जगभरात सुरू केली जाणार असल्याची माहिती मस्क यांनी दिली आहे. इव्हेंटमध्ये बोलताना मस्क म्हणाले की, उत्तर व दक्षिण ध्रुव वगळता जगभरात ऑगस्टपासून इंटरनेट सेवा सुरू होईल. वाचाः सध्या कोठे उपलब्ध आहे ? मस्क यांच्यानुसार, स्टारलिंकची ब्रॉडबँड सेवा सध्या टेस्ट स्वरूपात १२ देशात सुरू असून, दर महिन्याला यात वाढ होत आहे. भारतात ही सेवा कधी सुरू होईल याची माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशातील नागरिक ही सेवा वापरत आहे. सध्या किती ग्राहक Starlink सोबत जोडले आहेत ? मस्क यांनी माहिती देखील सध्या ६९ हजार अॅक्टिव ग्राहक आहेत. तसेच, पुढील १२ महिन्यात ५ लाखांचा टप्पा देखील गाठू, असे त्यांनी सांगितले. वाचाः स्टारलिंक काम कसे करते ? मस्क यांच्या या कंपनीने १८०० लो-ऑरबिट सेटेलाइट्स लाँच केल्या आहेत. लो-ऑरबिट सेटेलाइट्स असल्याने सेटेलाइट आणि पृथ्वीमधील सिंग्नलसाठीचा वेळ कमी लागतो. हेच कारण स्टारलिंकला जलद इंटरनेट सेवा पुरवणारा पुरवठादार बनवते. याशिवाय, जेथे इंटरनेट पोहचलेले नाही अशा ग्रामीण भागात देखील स्टारलिंक ही सुविधा देऊ शकते. तुम्हाला स्टारलिंकची सुविधा कशी मिळणार ? जगभरात सेवा पुरवण्यासाठी स्पेक्स एक्स आणि मस्क हे विविध देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांशी भागीदारी करण्याचा प्रयत्न करत आहे. इव्हेंटमध्ये बोलताना मस्क म्हणाले की, दोन मोठ्या देशातील कंपन्यांशी भागीदारी झाली आहे, मात्र आमचे भागीदारच यासंदर्भातील घोषणा करतील. तसेच, स्टारलिंकच्या सेवेसाठी इतर कंपन्यांसोबत देखील बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dscP2S