Full Width(True/False)

सायबर फ्रॉडपासून होणार सुरक्षा, सरकारने जारी केला हेल्पलाइन नंबर

नवी दिल्ली : भारतात सायबर फ्रॉडचे प्रमाणे गेल्या काही दिवसात वाढले आहे. अनेकदा फसवणूक होते व लोकांना याची माहिती देखील मिळत नाही. आपोआप एका मेसेजमुळे बँक खात्यातील लाखो रुपये उडालेले असतात. सायबर फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारने आधीच सायबर दोस्त नावाने एक प्लॅटफॉर्म तयार केला असून, जो ट्विटरवर सक्रिय आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने फसवणुकीपासून वाचण्यासाठी १५५२६० आणि रिपोर्टिंग प्लॅटफॉर्मची सुरूवात केली आहे.मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, सायबर फसवणुकीचे शिकार होणाऱ्या लोकांना तक्रार करण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन आणि रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करत आहोत. वाचाः मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात गृह मंत्रालयाने सायबर फसवणुकीपासून होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर १५५२६० आणि रिपोर्टिंग प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे. ही हेल्पलाइन १ एप्रिल २०२१ ला मर्यादित स्वरूपात सुरू करण्यात आली होती. हेल्पलाइन १५५२६० आणि याचे रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म हा इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन (आई4सी) द्वारे संचालित आहे. यात आरबीआय, सर्व मोठ्या बँका, पेमेंट बँका, वॉलेट आणि ऑनलाइन व्यवसायांची मदत मिळाली आहे. आय4सीने कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्था, बँका आणि मध्यस्थांना एकत्रित करण्यासाठी नागरिक वित्तीय सायबर फसवणूक माहिती आणि व्यवस्थापन प्रणाली संस्था विकसित केली आहे. वाचाः सध्या ही हेल्पलाइन छत्तीसगड, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाना, उततराखंड आणि उत्तर प्रदेशमधील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. लवकरच ही हेल्पलाइन सेवा पूर्ण भारतात लागू केली जाणार आहे. निवेदनात म्हटले आहे की, ही सेवा मर्यादित स्वरूपात सुरू केल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत हेल्पलाइनवरून १.८५ कोटी रुपये गुन्हेगारांच्या हातात जाण्यापासून वाचवले. हेल्पलाइन आणि रिपोर्टिंग प्लेटफॉर्मसोबत सर्व मोठ्या सरकारी आणि खासगी बँका जोडलेल्या आहेत. यामध्ये , पंजाब नेशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, यूनियन बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे समावेश आहे. यात , फोनपे, मोबिक्विक, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या कंपन्यांचा देखील समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3q7aCyX