Full Width(True/False)

किती होता विद्या बालनचा पहिला पगार? वाचा मजेशीर किस्सा

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये गणली जाते. लवकरच ती '' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विद्यानं तिच्या अभिनय कारकिर्दिची सुरुवात टीव्ही शोपासून केली होती. अगदी डर्टी पिक्चर पासून ते तुम्हारी सुलु पर्यंत तिनं अनेक स्त्रीप्रधान चित्रपट दिले. आज कोट्यवधींचं मानधन घेणाऱ्या विद्या बालनचा पहिला पगार ऐकून मात्र सर्वांना आश्चर्य वाटेल. विद्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केलाय. विद्या बालननं १९९५ साली 'हम पांच' या टीव्ही मालिकेतून अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. २००३ साली तिनं 'परिणिता' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. त्यानंतर तिनं 'पा', 'इश्किया' आणि 'कहानी' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले. आज विद्या बालन कोट्यवधीच्या रकमेत मानधन घेते. पण तिचं पहिलं मानधन किती होतं हे ऐकलं तर सर्वाच हैराण होतील. विद्या बालनचा पहिला पगार अवघे ५०० रुपये होता. एका हिंदी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालननं तिच्या पहिल्या पगाराबातचा खुलासा केला. विद्या सांगते, 'माझा पहिला पगार ५०० रुपये होता. जो मला एका स्टेट टूरिझम कॅम्पेनसाठी मिळाला होता. ही एक जाहिरात होती. ज्यासाठी काही लोकांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क केला होता. विद्यासोबतच तिचे भाऊ आणि बहीणींना त्या कॅम्पेनसाठी तेवढीच रक्कम देण्यात आली होती.' विद्या सांगते, 'माझी बहीण, मी आणि माझ्या चुलत भावासोबत त्याचा एक मित्र होता. आम्हाला चौघांनाही ५०० रुपये देण्यात आले होते.' या मुलाखतीत विद्यानं या कॅम्पेनच्या शूटिंगच्या वेळची एक आठवण सांगितली. ती म्हणाली, 'या कॅम्पेनसाठी आम्हाला एका झाडासोबत पोझ द्यायची होती. त्या झाडाला एक झोपाळा सुद्धा होता.' विद्या बालनला २०११ मध्ये रिलीज झालेल्या 'डर्टी पिक्चर' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या मुलाखतीत विद्यानं तिच्या पहिल्या ऑडिशनबद्दल सांगितलं. ती म्हणाली, 'त्यावेळी त्या टीव्ही शोसाठी जवळपास १५० लोकांनी ऑडिशन दिलं होतं. मला आठवतं मी माझ्या आई आणि बहिणीसोबत ऑडिशन देण्यासाठी फिल्मसिटीला गेले होते. त्यावेळी तिथे जवळपास १५० लोक होते. ज्यांचं ऑडिशन झालं होतं. शेवटी मी विचार केला होता की मी हे आता करणार नाही. पण तेव्हाच मला तिथून कॉल आला होता.' सध्या प्रेक्षकांना विद्या बालनचा चित्रपट 'शेरनी' बाबत कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर ती अधिकच वाढली आहे. या चित्रपटात विद्या एका फॉरेस्ट ऑफिसरची भूमिका साकारत असून येत्या १८ जूनला हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर रिलीज होत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35yaRJM