Full Width(True/False)

शर्टलेस बसून अर्जुन पाहत होता सिनेमा, मलायकाने केली कमेन्ट

मुंबई- बॉलिवूड अभिनेता नुकताच प्रदर्शित झालेल्या 'संदीप और पिंकी फरार' या त्याच्या सिनेमाच्या यशाचा आनंद घेत आहे. नुकताच त्याने हा सिनेमा त्याचा पाळीव श्वान मॅक्ससोबत पाहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे अर्जुनने मॅक्स सिनेमा पाहतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. यानंतर ने एक सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी अर्जुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. यात तो शर्टलेस असून जमिनीवर खाली बसलेला दिसत आहे. तर पलंगावर त्याचा श्वान मॅक्स बसलेला आहे आणि ते दोघेही 'संदीप आणि पिंकी फरार' हा सिनेमा पाहत आहेत. व्हिडिओला कॅप्शन देताना अर्जुनने लिहिले की, 'सिनेमाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर मॅक्सनेही संदीप और पिंकी फरार सिनेमा पाहण्यासाठी वेळ काढला.. तुम्ही पाहिलात का?' अर्जुन कपूरचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर कमेन्टही करत आहेत. चाहत्यांव्यतिरिक्त सेलिब्रिटीही यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अर्जुनची प्रेयसी आणि अभिनेत्री मलायका अरोरा हिनेही यावर कमेन्ट करत म्हटले की, 'सो क्यूट.' दरम्यान, अर्जुन आणि मलायका लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे, पण यासंदर्भात कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही. कामाबद्दल बोलायचे झाले तर 'संदीप और पिंकी' फरार या सिनेमाशिवाय अर्जुन कपूर 'सरदार का ग्रँडसन' सिनेमात दिसला होता. या सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी एकसारखाच रिव्ह्यू दिला होता. लवकरच अर्जुन कपूर आता 'भूत पोलिस' आणि 'एक विलेन २' सिनेमात काम करताना दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3p6wABm