नवी दिल्ली : स्मार्टफोनला काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आले होते. या एंट्री लेव्हल ४जी स्मार्टफोनला खूपच कमी किंमतीत लाँच करण्यात आले होते. या फोनची विक्री आजपासून सुरू होत असून, याची किंमत ५ हजारांपेक्षा कमी आहे. एखाद्या यूजरला फीचर फोनमधून स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करायचे असेल तर हा कमी बजेटमधील फोन चांगला आहे. Itel A23 Pro ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहुयात. वाचाः Itel A23 Pro ची किंमत आणि ऑफर्स: या फोनची किंमत ४,९९९ रुपये असून, यावर १,१०० रुपये सूट दिली जात आहे. ही ऑफर रिलायन्स जिओकडून दिली जात आहे. या फोनला रिलायन्स डिजिटल वेबसाइट, मायजिओ स्टोर्स आणि रिलायन्स डिजिटल स्टोर्सवरून खरेदी करता येईल. डिस्काउंटनंतर फोनला ३,८९९ रुपयात खरेदी करता येईल. हा फोन ब्लू आणि सफायर ब्लू रंगात येतो. ऑफर अंतर्गत itel A23 Pro च्या युजर्सला जिओकडून ३००० रुपयांचे बेनिफिट्स मिळत आहे. २४९ रुपयांपेक्षा अधिकचा रिचार्ज केल्यावर यात वाउचर मिळतील. नवीन व जुन्या दोन्ही यूजर्ससाठी ही ऑफर आहे. वाचाः Itel A23 Pro चे फीचर्स: हा ड्युल सिम सपोर्ट आणि अँड्राइड १० (गो एडिशन) सोबत येतो. यात ५ इंच FWVGA TN डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन ४८०x८५४ आहे. पिक्सल डेंसिटी १९६ ppi आहे. फोनमध्ये १.४ गीगाहर्ट्ज क्वाड-कोर Unisoc SC9832E चिपसेट देण्यात आले आहे. यात १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डद्वारे ३२ जीबीपर्यंत वाढवता येईल. Itel A23 Pro मध्ये २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच यात ०.३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्यूल-सिम ४जी, वाय-फाय, VoLTE, GPS, ब्लूटूथ, ३.५mm हेडफोन जॅक आणि मायक्रो-यूएसबी पोर्टसारखे फीचर्स मिळतील. यात पॉवरसाठी २४०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, यात फेस अनलॉक फिचर मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i86Bbe