Full Width(True/False)

जॅकी भगनानीसह नऊ व्यक्तींवर लैंगिक शोषणाचा आरोप

मुंबई: बॉलिवूडमध्ये तसं पाहायला गेलं तर लैंगिक शोषणाची प्रकरणं समोर येणं नवी गोष्ट नाही. मी टू चळवळीच्या अंतर्गत अनेक बॉलिवूड कलाकारांवर केल्याचे आरोप झाले आहेत. असं असताना आता एका २८ वर्षीय मॉडेल, अभिनेत्रीनं बॉलिवूडमधील नऊ प्रसिद्ध व्यक्तींच्या विरोधात लैंगिक शोषण आणि मारहाणीचा आरोप केला आहे. तिच्या तक्रारीनुसार मागच्या काही वर्षांमध्ये या लोकांनी तिचं लैंगिक शोषण केलं आहे. या मॉडेलनं मुंबई पोलिसांकडे याबाबतची तक्रार दाखल केली असून २०१३ ते २०१९ या दरम्यान तिच्यासोबत हा प्रकार घडल्याचं तिचं म्हणणं आहे. या मॉडेलनं दाखल केलेल्या तक्रारीत नऊ प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे. या मॉडेलनं दाखल केलेल्या तक्रारीमध्ये प्रसिद्ध फोटोग्राफार कोल्टन जूलियन, क्वॉन एंटरटेनमेंटचे माजी को-फाउंडर अनिर्बान ब्लाह, निर्माता-अभिनेता , टी-सीरिजचे , एएचएचे सीईओ अजित ठाकुर, जीरोधाचे को-फाउंडर निखिल कामत, निर्माता विष्णु इंदुरी, शील गुप्ता आणि गुरजोत सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. मॉडेलनं याआधी १२ एप्रिलला सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत मागच्या काही वर्षांपासून तिच्यासोबत होत असलेल्या लैंगिक शोषणाबद्दल सांगितलं होतं. याबद्दल 'बॉम्बे टाइम्स' बोलताना ही मॉडेल म्हणाली , 'या सर्व घटना माझ्यासोबत २०१३ ते २०१९ या काळात घडल्या आहेत. मी एकूण ११ लोकांवर आरोप केले असले तरी पोलिसांनी केवळ नऊ लोकांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. कारण मुंबईच्या बाहेर घडलेल्या घटनांच्या तक्रारी ते दाखल करून घेऊ शकत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मी डीसीपी महेश्वर रेड्डी यांना १ एप्रिलला भेटले होते. मात्र तक्रार २६ मे रोजी दाखल करण्यात आली आहे.' मॉडलच्या म्हणण्यानुसार ती अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईमध्ये आली होती. सिनेमात काम देण्याच्या नावाखाली तिची फसवणूक करत फोटोग्राफर कोल्सटन जूलियनने तिच्यावर अनेकदा बलात्कार तसेच मारहाण केली असं तिचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fXGGAD