Full Width(True/False)

वेब सीरिजमधले बाबा ठरले हिट; लोकप्रिय झालेल्या वडिलांच्या भूमिकांविषयी...

० व्हॉट द फोक्स कॉमेडी ड्रामा प्रकारात मोडणाऱ्या या सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. त्यातील जावई निखिलचं त्याच्या सासऱ्यांशी असलेलं नातं उलगडण्यात आलंय. तसंच निखिलच्या वडिलांचं पात्रसुद्धा भाव खाऊन गेलं. मुलगा आणि सूनेशी मोकळं नातं कसं असावं हे सदर सीरिजमधील वडिलांनी दाखवून दिलं. ० ट्रिपलिंग २ तीन भावंडांच्या आयुष्याभोवती फिरणारं कथानक असलेली 'ट्रिपलिंग' ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या तीन मुख्य पात्रांसह त्यांच्या वडिलांचं पात्र प्रेक्षकांना भावलं. तिघांचं म्हणणं समजून घेणारे आणि त्यांच्यातले वाद दूर करणारे बाबा प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. या पात्राचा स्क्रीनवरील वावर कमी असला तरी त्यांचा तीन भावंडांच्या विचारावर असलेला प्रभाव वेळोवेळी दिसून येतो. ० ब्रीद इनटू द शॅडोज मुलीचा जीव वाचवण्यासाठी वडील काय-काय करु शकतात हे सदर सीरिजमध्ये दिसतं. यात वडिलांची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक बच्चनच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं. या सीरिजचं कथानक प्रेक्षकांच्या मनात घर करतं. ० द फॅमिली मॅन २ सदर सीरिजमधील श्रीकांत तिवारी हे पात्र खूप भाव खाऊन गेलं. हे पात्र अभिनेता मनोज वाजपेयीने अतिशय उत्तमरित्या साकारलं आहे. एकीकडे देशाप्रती असलेली जबाबदारी निभावताना श्रीकांतचं कुटुंबावरही लक्ष असतं. या पात्राच्या अनेक कंगोऱ्यांपैकी वडिलाच्या बाजूने प्रेक्षकांना आपलंसं केलं. संकलन : मुंबई टाइम्स टीम


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iUlhuZ