Full Width(True/False)

'पवित्र रिश्ता २.०' मध्ये 'मानव' साकारणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता

मुंबई: झीटीव्हीवरील लोकप्रिय मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत अभिनेता आणि यांच्या मुख्य भूमिका होत्या. या दोघांनीही या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केलं होतं. पवित्र रिश्तामधील सुशांतनं साकारलेला मानव आणि अंकितानं साकरलेली अर्चना या दोन्ही भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगळी छाप सोडली होती. या मालिकेतून सुशांत आणि अंकिताला खूप लोकप्रियता मिळाली होती. आता ही मालिका नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील प्रेमकथा दाखवण्यात आली होती. अर्थात दोन वर्ष या मालिकेत काम केल्यानंतर सुशांतनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ही मालिका सोडली. त्यानंतर या मालिकेत अभिनेता हितेन तेजवानीनं मानवची भूमिका साकारली होती. पण जेव्हा आता ही मालिका पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तेव्हा यात मानवच्या भूमिकेत कोण दिसणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. २०१४ पर्यंत चाललेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून या मालिकेच्या दुसऱ्या सीझनची चर्चा सुरू होती. पण मानवची भूमिका कोण साकारणार याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. पण पिंकव्हिलानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 'पवित्र रिश्ता'च्या नव्या सीझनमध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शाहीर शेथ मानवची भूमिका साकारणार आहे. शाहीर शेखसोबतच अंकिता लोखंडे देखील या मालिकेत पुन्हा एकदा अर्चनाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात अद्याप निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीय. त्यामुळे शाहीर या मालिकेत मानवची भूमिका साकारणार की कोणी नवा चेहरा झळणार याबाबत कोणतीही माहिती नाही. सध्या शाहीर 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेच्या दुसऱ्या सीझनची शूटिंग करत आहे. पण जर शाहीर मानवच्या भूमिकेत दिसला तरीही चाहते त्याला अंकितासोबत सुशांतच्या जागी पसंत करतील की नाही याबाबत शंकाच आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gpDYFf