Full Width(True/False)

मरता मरता वाचला होता आमिर खान; काय घडलं होतं 'गुलाम' सिनेमाच्या सेटवर

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आणि राणी मुखर्जीचा 'गुलाम' सिनेमा प्रदर्शित होऊन २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा सिनेमा खूपच हिट झाला होता. यातील 'आती क्या खंडाला' या सिनेमातील गाणे तर तुफान लोकप्रिय झाले होते. केवळ इतकेच नाही तर युवा वर्गात तर या गाण्याची क्रेझ निर्माण झाली होती. अनेकांनी या गाण्यावर एकमेकांना प्रपोजही केले होते. या सिनेमातील भूमिका साकारण्यासाठी आमिर खानने खूप मेहनत घेतली होती. सिनेमातील एका दृश्याचे चित्रीकरण करताना त्याच्यावरच जीवावर बेतले होते. हे दृश्य चित्रीत करताना वाचला आमिर सिनेमातील एका दृश्यामध्ये आमिरला ट्रेनच्या समोर ट्रॅकवरून लाल झेंडा घेऊन धावायचे होते. दिग्दर्शकाने आमिरला सीन नीट समजावून सांगितला होता. ट्रेन जशी जवळ येईल तेव्हा रेल्वे ट्रॅकवरून आमिरने बाजूला उडी मारायची होती. परंतु हे दृश्य करताना आमिर त्यात इतका हरवून गेला की धावत धावत तो ट्रेनच्या समोरच जाऊन उभा राहिला होता. तेव्हा त्याच्या जीवावर बेतणार होते. परंतु सुदैवाने तसे काही घडले नाही. या संपूर्ण दृश्याचे चित्रीकरण सानपाडा स्टेशनवर झाले होते. या दृश्यासाठी रेल्वेकडून परवानगी घेण्यात आली होती. १२ दिवस आमिरने केली नव्हती आंघोळ! गुलाम सिनेमातील एका दृश्यासाठी आमिरने खूपच मेहनत घेतली होती. हे सिनेमातील क्लायमेक्सचे दृश्य होते. त्यामध्ये आमिर आणि सिनेमातील खलनायकामध्ये तुफान हाणामारी होते. यामध्ये आमिरला प्रचंड लागते आणि त्याचे रक्त वाहते असे दाखले होते. या दृश्यावरून अशीही एक चर्चा होती की हे दृश्य अधिक प्रभावी करण्यासाठी आमिरने १२ दिवस आंघोळ केली नव्हती. आती क्या खंडाला हे सुपरहिट गाणे 'गुलाम' सिनेमातील गाणे 'आती क्या खंडाला' हे १९९८ मधील सर्वात लोकप्रिय गाणे ठरले होते. या गाण्याने नितीन रायकवारने लिहिले होते. त्याच वेळी नितीन यांनी शाहरुख खानच्या 'जोश' मधील अपुन बोला तू मेरी लैला हे गाणे देखील लिहिले होते. सुपरहिट ठरला होता 'गुलाम' १९९८ मध्ये रिलीज झालेल्या 'गुलाम' हा सिनेमासाठी सात कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर 'गुलाम'ने १३ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली होती. तर जागतिक पातळीवर याच सिनेमाने २४ कोटी रुपयांची कमाई केली. हा सिनेमा त्या काळात १८५ स्क्रिनवर रिलीज झाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iUV27R