नवी दिल्ली : मिड-रेंज सेगमेंटमध्ये एकापेक्षा एक नवीन लाँच होत आहे. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या कमी किंमतीत दमदार फीचर्स असणारे ५जी फोन्स बाजारात आणत आहे. पोकोने आपला नवीन पोको एम३ प्रो ५जी ला १४ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केले आहे. या फोनची स्पर्धा सोबत असेल. या दोन्ही फोन पैकी फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत कोणता सर्वोत्तम आहे पाहुयात. वाचाः M3 Pro 5G vs : डिस्प्ले एम३ प्रो ५G Smartphone मध्ये ६.५ इंच (१०८०×२४०० पिक्सल) फुलएचडी+ डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ मिळेल. दुसरीकडे, ड्यूल सिम (नॅनो) सह येणाऱ्या रियलमीच्या फोनमध्ये ६.५ इंच (१०८०×२४०० पिक्सल) फुलएचडी डिस्प्ले मिळतो. याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशिया ९०:५ आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज, पिक्सल डेंटिसीटी ४०५ पिक्सल प्रति इंच आणि पीक ब्राइटनेस ६०० निट्स आहे. Poco M3 Pro 5G vs 8 5G: प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज पोकोच्या फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी ७०० ऑक्टा-कोर प्रोसेसरसोबत ग्राफिक्ससाठी माली- जी५७ MC२ जीपीयू मिळेल. फोनमध्ये ४ जीबी + ६४ जीबी आणि ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट पर्याय मिळेल. मायक्रोएसडी कार्डने स्टोरेजला १ टीबीपर्यंत वाढवता येईल. दुसरीकडे Realme 5G Mobile मध्ये देखील मीडियाटेक डाइमेंसिटी ७०० ऑक्टा-कोर प्रोसेसरसोबत ARM Mali-G५७ MC२ जीपीयू, ८ जीबी LPDDR4X रॅम आणि १२८ जीबी (UFS २.१) स्टोरेज मिळते. वाचाः Poco M3 Pro 5G vs Realme 8 5G: बॅटरी पोकोच्या फोनमध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. तर रियलमी ८ ५जी स्मार्टफोनमध्ये देखील १८ वॉट क्विक चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. Poco M3 Pro 5G vs Realme 8 5G: सॉफ्टवेयर फोन Android ११ वर आधारित MIUI १२ वर चालतो. तर रियलमी फोन अँड्राइड ११ वर आधारित Realme UI २.० वर काम करतो. Poco M3 Pro 5G vs Realme 8 5G: कनेक्टिव्हिटी पोकोच्या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ३.५ मिलीमीटर ऑडियो जॅक, एफएम रेडिओ सपोर्ट, सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर IR सेंसर, ड्यूल 4G VoLTE, ब्लूटूथ ५.१, वाय-फाय ८०२.११ एसी, यूएसबी टाइप-सी आणि जीपीएससारखे फीचर्स मिळतील. तर रियलमीच्या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.१, ड्यूल-बँड वाय-फाय, यूएसबी टाइप-सी पोर्ट, एनएफसी, ४G LTE आणि ५G सपोर्ट मिळेल. Poco M3 Pro 5G vs Realme 8 5G: कॅमेरा Poco 5G Mobile मध्ये अपर्चर एफ/१.७९ सोबत ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेंसर, सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर मिळतो. कॅमेरा सेंसरसोबत एलईडी फ्लॅश सपोर्ट मिळेल. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे. रियलमी ८ ५जी मध्ये f/१.८ लेंससोबत ४८ मेगापिक्सल Samsung GM1 प्रायमरी कॅमेरा सेंसर, २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम पोर्टेट लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस मिळेल. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर मिळेल. Poco M3 Pro 5G vs Realme 8 5G: डायमेंशन पोको फोनची लांबी आणि रुंदी १६१.८१x७५.३४x८.९२ मिलीमीटर आणि वजन १९० ग्रॅम आहे. दुसरीकडे रियलमी फोनची लांबी-रुंदी १६२.५x७४.८x८.५ मिलीमीटर आणि वजन १८५ ग्रॅम आहे. Poco M3 Pro 5G vs Realme 8 5G: किंमत पोको एम३ प्रो ५जी च्या ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये, ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. फ्लिपकार्टवर १४ जूनपासून विक्री सुरू होईल. एवढेच नाही तर पहिल्या सेलमध्ये फोन खरेदी केल्यास ५०० रुपये सूट मिळेल. म्हणजे, सूटसह फोनला क्रमशः १३,४९९ रुपये आणि १५,४९९ रुपयात खरेदी करता येईल. रियलमी ८ ५जी च्या ४ जीबी रॅम + ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये, ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे. हा फोन सुपरसोनिक ब्लॅक आणि सुपरसोनिक ब्लू रंगात येतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g2hCtg