Full Width(True/False)

मोठ्या बॅनरच्या सिनेमात पर्ल पुरी करणार होता काम; दिव्या खोसला कुमारनं दिली माहिती

मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपावरून अटकेत असलेल्या पर्ल वी पुरीच्या समर्थनार्थ अनेक कलाकार पुढे आले आहेत. त्यामध्ये अभिनेत्री, दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमारचे नाव आघाडीवर आहे. टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमारने पर्ल वी पुरीसोबत एका म्युझिकल व्हिडीओमध्ये काम केले होते. दिव्याने अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट करत पर्लला पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा दिव्याने पोस्ट करत पर्लची बाजू मांडली आहे. या पोस्टमधून दिव्याने पर्ल पुरीला जामिन मिळावा, अशी मागणी केली आहे. जमिनावर तो बाहेर आल्यानंतर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढू शकेल, असे मत तिने मांडले आहे. तिने पुढे असे म्हटले आहे की, 'याप्रकरणातून जर पर्ल निर्दोष सुटेल परंतु तोपर्यंत त्याच्या करीअरचे जे नुकसान होईल, त्याला कोण जबाबदार असेल?' त्यानंतर दिव्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, 'पर्लला एका मोठ्या बॅनरच्या सिनेमात काम मिळाले होते. परंतु या प्रकरणामुळे सर्व काही मातीला मिळाले आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम त्याच्या करीअरवर होणार आहे. पर्लचे करीअर आताशी सुरू झाले होते. टेलीव्हिजनमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती.' काय आहे प्रकरण अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप पर्ल वी पुरीवर ठेवला आहे. सध्या पर्ला न्यायालयीन कोठडी ठेवण्यात आले आहे. पर्लला अटक झाल्यानंतर त्याच्या समर्थनासाठी मनोरंजन विश्वातील रुचिका कपूर, मोहित कठुरिया, विकास कालांतरी, एकता कपूर, अनिता हसनंदानी सहीत अनेकांचा समावेश आहे. अनिता आणि एकता यांनी तर पर्लला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्या होत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2SmCBOx