नवी दिल्लीः पुढील वर्षाच्या जून पर्यंत लाँच केली जावू शकते. परंतु, लाँचिंग आधीच फेसबुकच्या स्मार्टवॉचसंबंधी खूप चर्चा सुरू झाली आहे. फेसबुक आपल्या स्मार्टवॉच मध्ये स्मार्टफोनची आवश्यक फीचर्स देणार आहे. फेसबुकच्या स्मार्टवॉचमध्ये असे अनेक फीचर्स असतील जे आतापर्यंत कोणत्याही स्मार्टवॉच मध्ये देण्यात आले नाही. यात कॉलिंग पासून कॅमेरा पर्यंत आणि सोशल मीडिया अॅक्सेस दिला जावू शकतो. परंतु, फेसबुककडून स्मार्टवॉच फीचर्स संबंधी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. वाचाः फेसबुक स्मार्टवॉचचे फीचर्स एका न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार, फेसबुक स्मार्टवॉच मध्ये एक युनिक डिस्प्ले दिला जाणार आहे. जो ड्यूअल कॅमेरा सेटअप सोबत येईल. या डिस्प्लेला स्मार्टवॉचपासून वेगळे करता येवू शकते. याच्या मदतीने फोटो क्लिक करण्यापासून व्हिडिओ कॅप्चर केले जाऊ शकते. सोबत स्मार्टवॉचच्या मदतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग सारखे अनेक हेल्थ फीचर्सचा सपोर्ट दिला जाणार आहे. स्मार्टवॉचच्या फ्रंट मध्ये एक कॅमेरा असणार आहे. यावरून व्हिडिओ कॉलिंग केली जावू शकते. हा कॅमेरा १०८० पिक्सल ऑटो फोकस सोबत येणार आहे. स्मार्टवॉच स्टेनलेस स्टील फ्रेम सोबत येईल. स्मार्टवॉच तीन कलर ऑप्शन ब्लॅक, व्हाइट, आणि गोल्ड मध्ये उपलब्ध केली जाईल. वाचाः किंमत लीक रिपोर्टनुसार, स्मार्टवॉचला ४०० डॉलर म्हणजेच जवळपास ३० हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले जाऊ शकते. फेसबुककडून या स्मार्टवॉचच्या नावाचा अद्याप खुलासा करण्यात आला नाही. जगभरातील स्मार्टवॉचच्या विक्रीत मोठी डिमांड आहे. काउंटरप्वाइंटच्या माहितीनुसार, अॅप्पलने गेल्या वर्षी ३४ मिलियन स्मार्टवॉचची विक्री केली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x9hQo5