Full Width(True/False)

वारंवार सिग्नल-कॉल ड्रॉपची समस्या जाणवते ? या ट्रिकद्वारे विना नेटवर्क कोणालाही करा फोन

नवी दिल्ली : आपल्या सर्वांनाच कधीना कधी नेटवर्क आणि कॉल ड्रॉप संबंधी समस्या जाणवली आहे. अनेकदा महत्त्वाचा फोन करायचा असतो व कॉल लागत नाही. मात्र, एका सोप्या ट्रिकद्वारे तुम्ही विना नेटवर्क कोणालाही कॉल करू शकता. ही ट्रिक काय आहे, जाणून घेऊया. वाचाः काही टेलिकॉम कंपन्या यूजर्सला वाय-फाय कॉलिंगची सुविधा देत आहे. याला म्हटले जाते. या सेवेची खास गोष्ट म्हणजे जर तुमच्या मोबाइलमध्ये नेटवर्क येत नसेल व कॉल ड्रॉप होत असेल तर याद्वारे तुम्ही कोणालाही कॉल करू शकता. ही सर्व्हिस विना नेटवर्क देखील कॉल करते व ही सर्व्हिस मोफत आहे. मात्र, यासाठी ४जी सिम आणि वाय-फाय असणे गरजेचे आहे. तुमच्या फोनमध्ये नेटवर्क येत नसेल व तुम्हाला महत्त्वाचा फोन करायचा असल्यास तुम्ही हा पर्याय वापरू शकता. एअरेटल आणि ग्राहकांना अशा प्रकारची सुविधा देत आहेत. ही सर्व्हिस कशी वापरू शकता पाहुयात. वाचाः एअरटेलवर याप्रकारे करा वॉय-फाय कॉलिंग अ‍ॅक्टिवेट
  • यासाठी यूजर्सला फोनच्या सेटिंग्समध्ये जावे लागेल.
  • त्यानंतर and वर टॅप करा.
  • यानंतर SIM and network जा.
  • येथे SIM 1 अथवा SIM 2 पैकी एक निवडा. यानंतर Turn on Wi-Fi Calling पर्यायावर क्लिक करा. ही पद्धत अँड्राइडसाठी आहे.
  • iOS साठी देखील फोनच्या सेटिंग्समध्ये जा.
  • येथे Mobile Data वर टॅप करा.
  • त्यानंतर Primary SIM आणि eSIM वर टॅप करा.
  • येथे Wi-Fi Calling वर टॅप करा.
  • येथे Turn on Wi-Fi Calling पर्यायवर क्लिक.
  • तुमच्या फोनमध्ये या सेवेचा लाभ घेता येईल की नाही तपासण्यासाठी https://ift.tt/35VWVry ला तुम्ही भेट देऊ शकता.
रिलायन्स जिओवर याप्रकारे करा वॉय-फाय कॉलिंग अ‍ॅक्टिवेट
  • यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन Wi-Fi and Internet वर टॅप करा.
  • येथे SIM and network पर्यायावर जा.
  • यानंतर SIM 1 अथवा SIM 2 पैकी एक पर्याय निवडून Turn on Wi-Fi Calling वर क्लिक करा. ही पद्धत अँड्राइडसाठी आहे.
  • iOS साठी देखील फोनच्या सेटिंग्समध्ये जा.
  • येथे Mobile Data वर टॅप करा.
  • त्यानंतर Primary SIM आणि eSIM वर टॅप करा.
  • येथे Wi-Fi Calling वर टॅप करा.
  • येथे Turn on Wi-Fi Calling पर्यायवर क्लिक.
  • तुमच्या फोनमध्ये या सेवेचा लाभ घेता येईल की नाही तपासण्यासाठी https://ift.tt/32hGGoc ला तुम्ही भेट देऊ शकता.
VoWiFi काय आहे? VoWiFi ला वॉयस ओवर वाय-फाय अथवा वॉयर ओवर आयपी (VoIP) म्हटले जाते. याद्वारे केवळ घरीच नाही तर सार्वजनिक वाय-फाय आणि वाय-फाय हॉटस्पॉटच्या मदतीने कॉल करता येईल. यासाठी मोबाइल नेटवर्कची गरज नसून, ही सर्व्हिस रोमिंगमध्ये देखील उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xE04dc