Full Width(True/False)

OnePlus भारतात लाँच करणार आणखी एक धमाकेदार फोन, पाहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : कंपनी लवकरच मधील आणखी एक धमाकेदार स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने भारतात OnePlus Nord CE 5G आणि अमेरिकेत OnePlus Nord N200 5G या फोन्सला लाँच केले होते. OnePlus Nord चा सक्सेसर असलेला OnePlus Nord 2 पुढील महिन्यात भारतात लाँच होऊ शकतो. ज्याप्रकारे नॉर्डमध्ये शानदार डिस्प्ले, पॉवरफूल बॅटरी आणि प्रोसेसरसोबत जबरदस्त कॅमेरा मिळतो. त्याचप्रमाणे सक्सेसर मध्ये देखील शानदार आणि अपग्रेडेट फीचर्स पाहायला मिळतील. वाचाः Oppo Reno 6 Pro+ चा रिब्रँडेड व्हेरिएंट? OnePlus Nord 2 ला भारतात Oppo Reno 6 Pro+ चा रिब्रँडेड व्हेरिएंट म्हणून लाँच केले जाऊ शकते. ओप्पो आणि वनप्लस या कंपन्या एकत्र आल्यानंतर आता दमदार फीचर्ससह फोन सादर करू शकतात. OnePlus Nord 2 च्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यात ६.३ इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. याचा रिफ्रेश रेट ९०हर्ट्ज असेल. फोनमध्ये अँड्राइड ११ ओएस आणि MediaTek Dimensity १२०० ५G SoC प्रोसेसरसोबत ८ जीबी/१२ जीबी रॅम आणि १२८जीबी/२५६जीबी स्टोरेज पर्याय मिळेल. वाचाः कॅमेरा आणि बॅटरी जबरदस्त OnePlus Nord 2 ला ट्रिपल रियर कॅमेऱ्यासोबत सादर केले जाईल. याचा प्रायमरी सेंसर ५० मेगापिक्सल असेल. यासोबत फोनमध्ये ८ मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेंस आणि २ मेगापिक्सल टेलिफोटो लेंस असू शकते. फ्रंटला सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेर मिळेल. यामध्ये ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत ४५००एमएएचची बॅटरी मिळेल. फोनमध्ये अनेक दमदार फीचर्स मिळू शकतील. याचा खुलासा लाँचिंग वेळेसच होईल. संभाव्य किंमत OnePlus Nord CE 5G ला कंपनीने २२,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत लाँच करण्यात आले होते. तर OnePlus Nord ला २४,९९९ रुपपये सुरुवाती किंमतीत लाँच केले होते. त्यामुळे भारतात OnePlus Nord 2 ला जवळपास ३० हजार रुपये किंमतीत लाँच केले जाऊ शकते. दरम्यान, सध्या वनप्लस ९ सीरिजच्या स्मार्टफोन्सची बंपर विक्री सुरू असून, यावर दमदार ऑफर्स मिळत आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j0cQ1k