नवी दिल्ली : चा Samsung Galaxy Z Fold 2 च्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. सॅमसंगचा हा फोल्डेबल स्मार्टफोन १५ हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. गॅलेक्सी झेड फोल्ड २ स्मार्टफोन गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत लाँच झाला होता व त्यानंतर २ आठवड्यात भारतात लाँच झाला होता. वाचाः फोल्डेबल फोनची किंमत ला गेल्यावर्षी १,४९,९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आला होता. आता या फोनच्या किंमतीत १५ हजार रुपयांनी कपात केल्याने फोन १,३४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या फोनची नवीन किंमत सॅमसंग इंडियाची अधिकृत वेबसाइट आणि अ‍ॅमेझॉन इंडियावर पाहायला मिळत आहे. रिटेल स्टोर्सवर देखील स्मार्टफोन नवीन किंमतीत मिळेल. वाचाः स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स Samsung Galaxy Z Fold 2 मध्ये ७.६ इंच फुल एचडी+ फोल्डेबल डायनामिक एमोलेड Infinity-O स्क्रीन देण्यात आली आहे. याचे रिझॉल्यशून १७६८x२२०८ पिक्सल आणि रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये सेकेंडरी डिस्प्ले ६.२ इंचाचा सुपर एमोलेड इंफिनिटी फ्लेक्स स्क्रीन आहे. हा फोल्डेबल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५+ प्रोसेसरसोबत येतो. फोन १२ जीबी रॅमसोबत येतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात १२+१२ मेगापिक्सलचे तीन कॅमेरे आहेत. तर फ्रंटला १० मेगापिक्सलचा सेंसर मिळेल. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत मिळेल ४,५००० mAh बॅटरी Samsung Galaxy Z Fold 2 स्मार्टफोनमध्ये ४,५०० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनमध्ये ५जी, ४जी LTE, Wi-Fi ६, ब्लूटूथ v५.०, अल्ट्रा वाइड बँड आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SjGZOh