Full Width(True/False)

कोट्यवधींची मालकीण आहे शिल्पा, वाचा तिची एकूण प्रॉपर्टी

मुंबई- 'बाजीगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आजही तितकीच लोकप्रिय आहे. शिल्पाने अनेक हिट चित्रपटात काम केलं. ९० च्या दशकात सुपरहिट अभिनेत्रींमधील एक असणारी शिल्पा आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते. आज ८ जून रोजी शिल्पा तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी शिल्पा कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे. शिल्पा सद्य स्थितीला १४८ कोटी रुपयांची मालकीण आहे. शिल्पा मुंबईत पती राज कुंद्रा आणि दोन मुलांसोबत राहते. शिल्पाचं मुंबईतील समुद्रकिनारी असणारं घरीदेखील प्रचंड मोठं आहे. या आलिशान घरात सजावटीसाठी अनेक महागड्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय शिल्पा अनेक लक्झरियस गाड्यांची देखील मालकीण आहे. २०१० साली राजने लग्नाच्या वाढदिवसाला शिल्पाला दुबईतील बुर्ज खलीफामधील एक फ्लॅट भेट म्हणून दिला होता. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. २०१५ साली हा फ्लॅट शिल्पाने विकला असल्याच्या चर्चा होत्या. इतरही अनेक देशात शिल्पाच्या मालकीची घरं आहेत. जी राजने तिला भेट म्हणून दिली आहेत. राजने लग्नानंतर शिल्पाला हे समुद्रकिनारी असणारं मुंबईतील घर भेट दिलं होतं कारण शिल्पा नेहमीच एका सी-फेसिंग असणाऱ्या घरात राहू इच्छित होती. शिल्पा नेहमीच घराचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. शिल्पाच्या घरात प्रायव्हेट जिम, स्विमिंग पूल, गार्डन आणि इतर अनेक सोई- सुविधा आहेत. शिल्पाने घराबाहेर एक मोठं ऑरगॅनिक गार्डन तयार केलं आहे. राज कुंद्राने शिल्पाला लग्नात घातलेल्या अंगठीची किंमतदेखील तीन कोटी होती. शिल्पाला लंडनमध्ये राहणंदेखील पसंत आहे त्यामुळे राजने लंडनमध्ये शिल्पासाठी ७ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. याशिवाय दुबईतील पाम जुमेराह येथेही शिल्पाचा एक बंगला आहे जिथे शिल्पा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जात असते. मुंबईत शिल्पाचे दोन मोठे हॉटेल्स आहेत. ज्यांची वर्षाची कमाई कोटींमध्ये आहे. मुंबईतील वरळी परिसरात ही हॉटेल्स आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zdnyr2