Full Width(True/False)

'हंटर'मध्ये झळकला होता शाल्व; म्हणाला या चित्रपटात काम करण्याचा अनुभव म्हणजे...

संपदा जोशी ० '' मालिकेतून पदार्पण केलंस. कसं वाटतंय?- वेगळा अनुभव आहे. याआधी चित्रपट किंवा सीरिजमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पण मालिकेत काम करताना खरंच खूप मजा येतेय. मालिकेची गोष्ट पुढे सरकते तसं पात्र उलगडत जातं. त्या पात्राला वेगवेगळे कंगोरे मिळत जातात. पुढे काय होणारे हे माहिती नसताना कथानकाप्रमाणे बदलणाऱ्या पात्राची मजा अनुभवता येतेय. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ० पहिल्याच मालिकेत मुख्य भूमिका साकारणं किती आव्हानात्मक होतं?- फक्त मुख्य भूमिका आव्हानात्मक असते असं काही नाही. प्रत्येक भूमिकेची गरज वेगळी असते. फरक एवढाच की मुख्य भूमिका असणाऱ्यांना चित्रीकरण जास्त दिवस करावं लागतं. सुट्ट्या खूप कमी मिळतात. काम इतरांपेक्षा थोडं अधिक असतं हेच काय ते आव्हान. बाकी आव्हानं सारखीच आहेत. ० छोट्या पडद्यावर काम करण्याचा निर्णय कसा घेतलास?- अगदी खरं सांगायचं तर मी ठरवलं नाही. मालिका सुरू होण्याआधी निर्मात्यांचा फोन आला होता आणि त्या म्हणाल्या की 'एका मालिकेसंबंधी तुला भेटायचं आहे.' मी एक-दीड वर्ष मालिकेसाठी लागणारा वेळ देऊ शकणार नाही असं माझं आधी ठरलं होतं. मी मालिकेत कधी काम केलं नसल्यानं माझ्यासाठी ते आव्हान ठरेल असं मला वाटलं. पण तरी मी त्यांना जाऊन भेटलो. तिथला परिसर, वातावरण, सेट सगळंच इतकं छान होतं की मी लगेच होकार दिला. ० 'हंटर' या हिंदी चित्रपटातून तू अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंस. तो अनुभव कसा होता?- आयुष्यभर मनात साठवून ठेवावा, असा अनुभव आहे तो. त्यावेळेस मी नाटकांमध्ये काम करत होतो आणि काही लघुपटसुद्धा केले होते. मी थिएटर करायचो तिथे मी ऑडिशन्स द्यायचो. 'हंटर'च्या ऑडिशन्सचं माझं सादरीकरण त्यांना आवडलं आणि माझी निवड झाली. अनुभवी कलाकारांसह काम करण्याचा अनुभव खरंच छान होता. ० तुझ्या मालिकेला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं, कलाकार म्हणून तू याकडे कसं बघतोस?- ट्रोलिंग हासुद्धा एक प्रसिद्धीचा भाग आहे. प्रेक्षकांना एखादी गोष्ट मजेशीर वाटते किंवा एखादी गोष्ट आवडत नाही म्हणूनच ते ट्रोल करतात. मालिकेवर जे मीम्स येतात ते मी वाचतो. ते वाचून छान वाटतं की आपल्या मालिकेची चर्चा होतेय. ० अभिनयाव्यतिरिक्त तुझे छंद कोणते?- मला मोटर स्पोर्टस् आवडतात. वेगवेगळ्या रेसिंग बाइक्स, कार यांची खूप आवड आहे. मेकॅनिकल गोष्टी जास्त आवडतात. स्वयंपाकाचीसुद्धा मला आवड आहे. वेळ मिळेल तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. ० तू तरुणींमध्ये लोकप्रिय आहेस. कसा प्रतिसाद मिळतोय?- खूप प्रेम मिळतं. कौतुक होतं. ओमकार या माझ्या भूमिकेवर त्यांचं प्रेम आहे. त्यांनी असंच प्रेम करत राहावं अशी इच्छा आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zuPC9t