नवी दिल्लीः Xiaomi आपल्या युजर्संसाठी एक जबरदस्त Pay Day Sale घेऊन आली आहे. हा सेल ८ जून पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये शाओमी आणि रेडमीच्या स्मार्टफोन शिवाय, Mi व Redmi TV वर सुद्धा बेस्ट डील आणि डिस्काउंट सोबत खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये कंपनी या प्रोडक्ट्सवर ११ हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. जाणून घ्या या सेलमध्ये मिळणाऱ्या काही जबरदस्त ऑफर्स संबंधी. वाचाः शाओमी Mi 10T शाओमीच्या या प्रीमियम स्मार्टफोनला या सेलमध्ये ७ हजार रुपयांच्या सूट सोबत खरेदी केले जाऊ शकते. सूटनंतर या फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपयांऐवजी ३२ हजार ९९९ रुपये झाली आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनच्या रियर मध्ये ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. वाचाः Mi 10T Pro या सेलमध्ये या फोनवर कंपनी ११ हजार रुपयांची सूट सोबत ऑफर करीत आहे. सूट नंतर फोनची किंमत ३६ हजार ९९९ रुपये झाली आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियरमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. वाचाः रेडमी ९ पॉवर या सेलमध्ये रेडमीचा हा बजेट स्मार्टफोन १६ हजार ९९९ रुपयांऐवजी १२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ चिपसेट दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TzTHbS