नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने आपला एक प्रसिद्ध प्लानमध्ये बदल केला आहे. हा प्लान ४९९ रुपयांचा आहे. बीएसएनएलने आता या प्लानमध्ये दुप्पट डेटा ऑफर केली आहे. ग्राहकांना दुप्पट डेटाचा फायदा १ जून २०२१ पासून मिळणे सुरू होणार आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा प्लान सर्व सर्कलमध्ये उपलब्ध आहे. वाचाः आता रोज मिळणार २ जीबी डेटा टेक वेबसाइट OnlyTech रिपोर्टच्या माहितीनुसार, बीएसएनएलच्या ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना आता रोज २ जीबी डेटा दिला जाणार आहे. आधी या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा दिला जात होता. कंपनीने या प्लानची किंमतीत किंवा वैधतेत कोणताही बदल केला नाही. ४९९ रुपयांचा प्लान हा ९० दिवसांच्या वैधतेसोबत येतो. यात अनलिमिटेड कॉलिंग (दिल्ली आणि मुंबईसाठी सुद्धा) रोज १०० एसएमएस आणि Zing Music अॅपचे सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जात आहे. वाचाः ४९९ रुपयांचा प्लान कसे अॅक्टिवेट कराल जर तुम्ही बीएसएनएलचे प्रीपेड मोबाइल ग्राहक असला तर या प्लानला अॅक्टिवेट करायचे असेल तर याची पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही ४९९ रुपयांच्या किंमतीत ऑनलाइन रिचार्ज करू शकता. किंवा बीएसएनएलच्या स्टोरवर जाऊन हा प्लान खरेदी करू शकता. ऑनलाइन रिचार्जसाठी तुम्ही My BSNL App किंवा कंपनीची वेबसाइटचा वापर करू शकता. वाचाः ज्यांनी आधी केले होते रिचार्ज जर तुम्ही बीएसएनएलचा ४९९ रुपयाचा प्लान आधीच रिचार्ज केला असेल तर तुम्हाला १ जीबी डेटा रोज मिळू शकेल. हा प्लान संपल्यानंतर पुन्हा ४९९ रुपयांच्या रिचार्जवर तुम्ही रोज २ जीबी डेटाचा फायदा घेऊ शकता. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yU3lGH