Full Width(True/False)

Google Pixel 4a स्मार्टफोनवर बंपर ऑफर, मिळत आहे तब्बल ५ हजारांची सूट

नवी दिल्ली : Pixel 4a खरेदी करण्याची चांगली संधी आहे. या फोनवर शानदार ऑफर्स मिळत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये या स्मार्टफोनला लाँच करण्यात आले होते. त्यावेळी च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये होती. मात्र, आता ५ हजार रुपये सूटसह २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः Google pixel 4a स्मार्टफोनवर आतापर्यंतची सर्वाधिक सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनला मध्ये सूटसह खरेदी करता येईल. हा सेल १३ जूनला सुरू झाला असून, १६ जूनपर्यंत चालेल. फोनला सेलमध्ये क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट आणि क्रेडिट कार्डवर ५ टक्के कॅशबॅक ऑफर मिळत आहे. Google pixel 4a चे स्पेसिफिकेशन्स Google Pixel 4a स्मार्टफोनमध्ये ५.८१ इंच फुल-एचडी+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे स्क्रिन रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल, आस्पेक्ट रेशियो १९:५:९ आणि पिक्सल डेंसिटी ४४३ आहे. फोन ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon ७३०G चिपसेटसोबत येता. हा फोन अँड्राइड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. वाचाः कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी Pixel 4a स्मार्टफोनमध्ये रियरला एफ/१.७ अपर्चरसोबत १२ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोन ड्यूल एक्सपोजर कंट्रोलसोबत एचडीआर+ सपोर्ट, पोर्ट्रेट मोड, टॉप शॉट, नाइट साइट सोबत येता. यात फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर मिळेल. यात रियर पॅनेलवर फिंगरप्रिंट सेंसर देखील मिळतो. फोन मोशन सेंसिंग आणि गेस्चर कंट्रोलसोबत येतो. यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ३,१३४० एमएएचची बॅटरी मिळते. फोनमध्ये एक यूएसबी टाइ-सी मिळेल. यात नॉयस सप्रेशन सपोर्टसोबत स्टीरियो स्पीकर आणि दोन मायक्रोफोन आहेत. फोनचे डायमेंशन १४४x69.४x८,२ मिलीमीटर आणि वजन १४३ ग्रॅम आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3woqa3o