नवी दिल्ली : ग्लोबलने आपला नवीन बजेट Nokia C01 Plus ला लाँच केले आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या सारखाच आहे, मात्र यात काही फीचर्स वेगळे देण्यात आले आहे. हा अँड्राइड ११ गो एडिशनसोबत येतो व यात स्पलॅश-प्रूफ फीचर केसिंग देण्यात आले आहे. सोबतच, सेल्फी कॅमेरा देखील यात देण्यात आला आहे. यात १६ जीबी स्टोरेज आणि ३००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. वाचाः C01 Plus च्या किंमतीबद्दल सांगायचे तर १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज फोनची किंमत ६,४९० RUB (जवळपास ६,६०० रुपये) आहे. हा फोन रशियात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. फोन ब्लू आणि पर्पल दोन रंगात उपलब्ध आहे. इतर देशातील फोनच्या किंमती आणि उपलब्धतेबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. Nokia C01 Plus चे स्पेसिफिकेशन्स या स्मार्टफोनमध्ये ड्यूल नॅनो सिम सपोर्ट मिळेल व हा फोन अँड्राइड ११ (Go edition) वर चालतो. फोनमध्ये ५.४५ इंचचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझॉल्यूशन ७२०x१४४० पिक्सल आहे. याचा आस्पेक्ट रेशिया १८:९ आहे. फोनमध्ये octa-core Unisoc SC9863a SoC प्रोसेसर मिळेल. यासोबत १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल. वाचाः Nokia C01 Plus चा कॅमेरा कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. दोन्ही कॅमेरे एलईडी फ्लॅशसोबत येतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४G LTE, Wi-Fi ८०२.११ b/g/n, Bluetooth v४.२, GPS/ A-GPS, FM radio, Micro-USB port आणि ३.५mm चा हेडफोन जॅक मिळेल. यात Accelerometer, Ambient light sensor आणि Proximity sensor देण्यात आले आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3geCht6