Full Width(True/False)

लाँचिंगच्या आधीच Realme GT 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : स्मार्टफोनच्या लाँचिंगच्या आधीच किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहे. या फोनला मार्चमध्येच चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. त्यामुळे स्मार्टफोनला लवकरच भारतात लाँच केले जाण्याची शक्यता आहे. भारताच्या आधी GT 5G ला जागतिक बाजारात लाँच केले जाऊ शकते. ३ जूनला रियलमीचे ग्लोबल ५ जी समिट आहे. यात अनेक प्रोडक्ट्स सादर केले जाणार आहेत. वाचाः संभाव्य किंमत लीक रिपोर्टनुसार Realme GT 5G ला निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या पर्यायासह लाँच केले जाईल. फोनला ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केले जाईल. किंमतीबद्दल सांगायचे तर ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला EUR ४०० (जवळपास ३५,७०० रुपये) आणि १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला EUR ४५० (जवळपास ४०,२०० रुपये) किंमतीत लाँच केले जाऊ शकते. वाचाः Realme GT 5G चे स्पेसिफिकेशन्स Realme GT 5G स्मार्टफोन मध्ये ६.४३ इंच फूल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो १२० Hz रिफ्रेश्ड रेट सोबत येईल. फोनमध्ये Snapdragon 888 SoC चिपसेट सपोर्ट मिळेल. यात १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले जाईल. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात चा ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. या व्यतिरिक्त ११९ डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यूसोबत ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, २ मेगापिक्सल मॅक्रो लेंसचा सपोर्ट मिळेल. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये ६५W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi ६, USB Type-C पोर्ट आणि एक ३.५mm ऑडियो जॅक सपोर्ट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wRB1mw