Full Width(True/False)

Reliance AGM 2021: रिलायन्सची वार्षिक बैठक आज दुपारी, मुकेश अंबानी 'ही' घोषणा करणार?

नवी दिल्लीः देशात 5G स्मार्टफोन्सच्या वाढत्या स्पर्धेत आज रिलायन्सची मोस्ट अवेटेड Jio 5G फोनला लाँच करण्याची शक्यता आहे. आज चे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात कंपनी 5G रोलआउट प्लानची घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी या वार्षिक जरनल बैठकीत आपला स्वस्त लॅपटॉप लाँच करू शकते. याचे नाव JioBook आहे. वाचाः व्हर्च्यूअल असणार इव्हेंट AGM रिलायंस इंडस्ट्रीची ४४ वी वार्षिक जनरल मीटिंग आज दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे. याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. AGM चे लाइवस्ट्रीम रिलायन्सच्या सर्व शेयरहोल्डर्ससाठी JioMeet द्वारे केला जाणार आहे. याशिवाय, या इव्हेंटला सामान्य लोक सुद्धा यूट्यूबवर पाहू शकतात. या बैठकीत Jio 5G फोनची घोषणा करण्याची शक्यता आहे. ऑपरेटिंग सिस्टम बनवण्याचा प्लान रिलायन्स इंडस्ट्रीची कंपी जिओला गेल्या वर्षी जुलै महिन्यात ३३ हजार ७२३७ कोटी रुपयांची गुंतवणूक गुगलकडून मिळाली आहे. या डीलमध्ये 4G आणि 5G फोन साठी अँड्रॉयड बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम बनवण्यासाठी प्लानचा समावेश आहे. या सिस्टमला JioOS म्हटले जावू शकते. 5G नेटवर्कची घोषणा होण्याची शक्यता Jio 5G फोन शिवाय रिलायन्स एजीएम दरम्यान या महिन्यात Jio 5G नेटवर्कच्या रोलआउट संबंधी मोठी घोषणा केली जाऊ शकते. रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी डिसेंबर मध्ये खुलासा केला होता की, जिओ ५जी सर्विसची सुरुवात भारतात २०२१ च्या सेकंड हाफमध्ये केली जाऊ शकते. टेलिकॉम कंपनी नेक्स्ट जनरेशन नेटवर्कच्या पब्लिक रोलआउट आधी क्वॉलकॉम कंपनी सोबत मिळून टेस्टिंगवर काम करीत आहे. JioBook सुद्धा होऊ शकतो लाँच एजीएम दरम्यान, कंपनी आपले लो कॉस्ट लॅपटॉप संबंधित माहिती शेअर करू शकते. याचे नाव JioBook असू शकते. यावरून दावा केला जात आहे की, हे 4G LTE कनेक्टिविटी सोबत येईल. आणि Android आधारित JioOS वर काम करेल. Microsoft Windows 11 ची लाँचिंग होऊ शकते मायक्रोसॉफ्टने २०१५ मध्ये Windows 10 लाँच केले होते. आता ६ वर्षानंतर कंपनी नेक्स्ट जनरेशन विंडो लाँच करू शकते. यात युजर्संना अनेक लेटेस्ट फीचर्स मिळू शकते. मायक्रोसॉफ्ट पर्सनल कम्प्यूटर युजर्ससाठी Windows 11 लाँच करणार आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gTkXLy