Full Width(True/False)

२१ हजाराच्या ViVO Y73 फोनवर १६ हजाराची बचत, ब्लूटूथ स्पीकरही फ्री, पाहा ऑफर

नवी दिल्ली : विवोने आपला शानदार ViVO Y73 लाँच केला आहे. फोन आपल्या स्टायलिश बॅक पॅनेलमुळे चर्चेत आहे. कंपनीने या बजेट स्मार्टफोनला ८ जीबी + १२८ जीबी या एका व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत २०,९९० रुपये आहे. मात्र फोनला तुम्ही फक्त ५ हजार रुपयात खरेदी करू शकता. वाचाः वर मिळत आहे ऑफर
  • फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. येथे फोनवर १४,६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे. मात्र, ही एक्सचेंज ऑफर जुन्या फोनच्या स्थितीवर आणि मॉडेलवर अवलंबून आहे.
  • या व्यतिरिक्त कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डवर १००० रुपये इंस्टंट डिस्काउंट आणि बँकेच्या क्रेडिट कार्डवर ५०० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल.
  • अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक दिले जात आहे.
  • म्हणजे, तुम्हाला एक्सजेंज बोनसवर १४,५००, कोटक बँक क्रेडिट कार्डवर १००० रुपये अशी एकूण १५,६०० रुपये सूट मिळत आहे. थोडक्यात, तुम्ही २०,९९० रुपयांच्या फोनला केवळ ५,३९० रुपयात खरेदी करू शकता.
वाचाः मोफत मिळेल स्पीकर फोन डायमंड फ्लेयर आणि रोमन ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. कंपनीच्या अधिकृत साइटवर देखील एक्सचेंज ऑफर, फ्री ब्लूटूथ स्पीकर विथ ऑल प्रीपेड ऑर्डर्स, वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटी, १५ दिवसांची रिप्लेसमेंट पॉलिसी, कॅशबॅक, 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआ, कॅश ऑन डिलिव्हरीसह अनेक ऑफर्स मिळतील. Vivo Y73 चे बेसिक स्पेसिफिकेशन फोनमध्ये ६.४४ इंचाचा टचस्क्रीन एफएचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन २४००x१०८० आहे. फोन मीडियाटेक हेलियो जी९५ प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोरेजसोबत येतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोन अँड्राइड ११ वर आधारित Funtouch OS ११.१ वर काम करतो. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा अपर्चर f/१.७९ सोबत ६४ मेगापिक्सल सेंसर आहे. दुसरा f/२.४ अपर्चरसोबत २ मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा आणि तिसरा f/२.४ अपर्चरसोबत २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. सेल्फीसाठी f/२.० अपर्चरसोबत १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये रियर कॅमेऱ्यामध्ये ४K व्हिडीओ, ऑटोफोक्स, नाइट, अल्ट्रा स्टेबल व्हिडीओ, सुपर मॅक्रो, बोकेह, पोट्रेट, मल्टी-स्टाइल पोट्रेट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तर फ्रंटला नाइट, स्टेडीफेस, पोट्रेट लाइट इफेक्ट, व्हिडीओ फेस ब्यूटी, ड्यूल-व्ह्यू व्हिडीओ सारखे फीचर्स मिळतील. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय २.४GHz, ५GHz, ब्लूटूथ ५.०, यूएसबी टाइप-सी, जीपीएस, ओटीजी, एफएम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2St0Jz4