Full Width(True/False)

टेक्स्ट करणे झाले खूपच सोपे, आता टाइप न करता असा करा WhatsApp वरून मेसेज

नवी दिल्ली : अनेकदा लांबलचक टाइप करायचा आपल्याला कंटाळा येतो. मात्र, आता तुम्ही सहज टाइप न करता वॉयसद्वारे मेसेज पाठवू शकता. आज आम्ही तुम्हाला वरील अशीच एक सोपी ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज टाइप न करता कोणालाही मेसेज करू शकाल. ही ट्रिक काय आहे जाणून घेऊया. वाचाः असा पाठवा टाइप न करता WhatsApp मेसेज
  • सर्वात प्रथम ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे त्याचा चॅट बॉक्स ओपन करा.
  • की-बोर्ड ओपन करा. येथे तुम्हाला मायक्रोफोनचे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • हे केल्यानंतर माइक अ‍ॅक्टिवेट होईल.
  • येथे तुम्हाला जो मेसेज पाठवयाचा आहे, तो बोला. तुम्ही वॉयस दिलेला मेसेज आपोआप टाइप होईल.
  • यानंतर तुम्ही मेसेज सेंड करू शकता.
दरम्यान, WhatsApp ने काही दिवसांपूर्वीच म्यूट व्हिडीओ फीचर जारी केले होते. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे यात व्हिडीओ पाठवण्याआधी म्यूट करता येईल. म्हणजे समोरील यूजर्सला आवाज येणार नाही. याआधी सर्व यूजर्ससाठी कंपनीने फीचर देखील आणले होते. या फीचरमुळे तुमचे मेसेज, फोटो आणि व्हिडीओ एका आठवड्यानंतर आपोआप डिलीट होतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vtRpZ6