Full Width(True/False)

WhatsApp पेमेंट्सच्या प्रमुखपदी मनेश महात्मे यांची नियुक्ती, अ‍ॅमेझॉनसोबतही केले आहे काम

नवी दिल्ली : ने अ‍ॅमेझॉनचे माजी एक्झिक्यूटिव्ह यांची भारतातील पेमेंट बिझनेसच्या डायरेक्टरपदी नियुक्ती केली आहे. काही महिन्यांपूर्वीच WhatsApp ने भारतात पेमेंट सेवा सुरू केली आहे. मनेश यांना जबाबदारी मिळाल्यानंतर आता यूजर्ससाठी पेमेंट्स अनुभव अधिक चांगला करण्यावर लक्ष दिले जाईल. वाचाः निवेदनात म्हटले आहे की, WhatsApp डिजिटल आणि फायनेंशियल व्हिजनला भारतात वाढवण्यासाठी काम करणार आहे. मनेश यांना डिजिटल फायनेंशियल सर्व्हिस आणि पेमेंट्स जसे की सिटीबँक, एअरटेल मनी आणि अ‍ॅमेझॉनमध्ये १७ वर्षांचा अनुभव आहे. मनेश यांनी अ‍ॅमेझॉननंतर आता WhatsApp ज्वाइन केले आहे. पे इंडियामध्ये ते ७ वर्ष डायरेक्टर आणि बोर्ड मेंबर होते. यादरम्यान त्यांनी प्रोडक्ट, इंजिनिअरिंग आणि ग्रोथ टिम्सचे नेतृत्व केले. मनेश यांच्या WhatsApp मध्ये येण्याने उत्साहित असल्याचे देखील WhatsApp इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस म्हणाले. वाचाः अभिजीत बोस पुढे म्हणाले की, मनेश भारतात डिजिटल पेमेंट्स ग्रोथबाबत एक महत्त्वाचे इनोव्हेटर राहिले आहेत. त्यांनी उत्तम काम केले आहे व त्यांच्या अनुभवाचा आम्ही फायदा करू न घेऊ. ज्यामुळे WhatsApp पेमेंट्स आणि सेलला प्रोत्साहन मिळेल. WhatsApp मध्येसर्व वर्गाच्या लोकांना डिजिटलरित्या सशक्त बनवणे आणि यूपीआय व डिजिटल पेमेंट माध्यमातून आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना वेग देण्याची क्षमता आहे. मनेश महात्मे याबाबत बोलताना म्हणाले की, ‘WhatsApp पेमेंट्स देशाच्या विकासाच्या अजेंड्यामध्ये महत्वपूर्ण भागीदार आहे. यामुळे संपूर्ण भारतात यूजर्ससाठी डिजिटल पेमेंट सोपे होईल. मी या विकासाच्या कथेचा एक भाग झाल्याने खूप उत्साहित आहे.’ २०१८ पासून टेस्टिंग २०१८ मध्ये सर्वात प्रथम फेसबुकच्या मालकीच्या WhatsApp ने भारतात यूपीआय आधारित पेमेंट सेवेचे टेस्टिंग सुरू केले होते. हे टेस्टिंग १० लाख लोकांपर्यंतच मर्यादित होते. कारण, यासाठी परवानगी मिळाली नव्हती. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये WhatsApp ला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून देशात पेमेंट सेवा अधिकृतरित्या सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dn4XPU