नवी दिल्लीः भारतातील पहिला 5G फोन कोणता होता?, हे जाणून घ्या. भारतातील पहिला ५जी स्मार्टफोन चीनी स्मार्टफोन कंपनी Realme ने आणला होता. या फोनचे नाव होते. या स्मार्टफोनच्या खरेदीवर १७ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनला मध्ये विक्रीसाठी लिस्ट करण्यात आले आहे. या सेलची सुरुवात ५ जुलै पासून करण्यात आली आहे. हा सेल ९ जुलै २०२१ पर्यंत चालेल. फोनला Realme.com आणि Flipkart वरून खरेदी करू शकता. ही एक लिमिटेड पीरियड सेल आहे. वाचाः १७ हजाराची सूट मिळतेय Realme X50 Pro 5G स्मार्टफोनवर १७ हजार रुपयांची इस्टेंट सूट दिली जात आहे. तर फोनला SBI क्रेडिट कार्ड वरून खरेदी केल्यास १० टक्के अतिरिक्त सूट दिली जात आहे. Realme X50 Pro 5G फोनला तीन स्टोरेज ऑप्शन मध्ये 12GB RAM + 256GB, 8GB RAM + 128GB आणि 6GB RAM + 128GB मध्ये लाँच करण्यात आले आहे. याच्या बेस व्हेरियंटची किंमत ३७ हजार ९९९ रुपये ठेवली आहे. याच्या 8GB RAM + 128GB व्हेरियंटची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. तर याच्या टॉप अँड व्हेरियंटची किंमत ४४ हजार ९९९ रुपये आहे. फोनच्या टॉप व्हेरियंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या फोनची किंमत फ्लिपकार्टवर ३० हजार ९९९ रुपये आहे. लाँचिंग वेळी या फोनची किंमत ४४ हजार ९९९ रुपये होती. वाचाः फोनची फीचर्स Realme X50 Pro 5G मध्ये ६.४४ इंचाचा ड्युअल पंच होल डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये Samsung च्या Super AMOLED डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. फोन 90Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 SoC प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. फोन मध्ये 65W चा सुपरडार्ट फास्ट चार्जिंग आहे. ३५ मिनिटात फुल चार्ज केले जाते. फोनमध्ये 4,200mAh ची ड्युअल सेल बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. फोन Android 10 वर आधारित Realme UI 1.0 वर रन करतो. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा दिला आहे. याशिवाय, 12MP चा टेलिफोटो लेंस, 8MP चा अल्ट्रा वाइड लेंस आणि एक B&W लेंस दिला आहे. सेल्फीसाठी ड्यूल सेल्फी कॅमेरा (32MP+8MP)चा सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yudmci