नवी दिल्ली. अलीकडेच एक बातमी उघडकीस आली होती की, ९ अँड्रॉइड App युजर्स फेसबुक लॉगिनची क्रेडेन्शियल्स हॅक करत आहेत. हे अॅप्स डॉक्टर वेबसाइट्स मालवेयरने शोधले आहेत. डॉक्टर वेबच्या अहवालानुसार हे अॅप्स ५,८५६,०१० वेळा डाउनलोड केले गेले आहेत. गुगलने ही ९ अॅप्स प्ले स्टोअर वरून काढली आहेत. परंतु,या फेसबुक ट्रॅकर मालवेअरने अनेक फेसबुक लॉगिन क्रेडेन्शियल्स हॅक केले असतील असा अंदाज लावण्यात येत आहे. अशात तुम्हाला तुमच्या फेसबुक लॉगिनच्या क्रेडेन्शियल्समध्ये काही बदल करावे लागतील. यामुळे तुमचे फेसबुक अकाउंट सुरक्षित राहण्यास मदत मिळेल. यासाठी काही टिप्स वापरता येतील. वाचा: फेसबुक पासवर्ड बदला: सर्वप्रथम आपला फेसबुक पासवर्ड बदला. पासवर्ड कठीण आणि लक्षात ठेवण्यास सोप्पी असेल असा ठेवण्याचा प्रयत्न करा. हा पासवर्ड इतर कोणत्याही खात्यासह शेयर केला जाऊ नये हे आवर्जून लक्षात ठेवा. फेसबुक अकाउंटचा पासवर्ड या प्रमाणे बदला:
- प्रथम फेसबुक सेटिंग्ज वर जाऊन सुरक्षा आणि लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर लॉगिन विभागात जाऊन आणि पासवर्ड बदला बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर आपला वापरात असलेला पासवर्ड प्रविष्ट करा आणि नवीन पासवर्ड प्रविष्ट करा.
- नंतर सेव्ह बदलांवर क्लिक करा.
- प्रथम फेसबुक सेटिंग्ज वर जाऊन आणि सुरक्षा आणि लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर लॉगिन विभागात जा आणि शो मोअर वर क्लिक करा.
- त्यानंतर सर्व सत्रांच्या लॉगआउटवर क्लिक करा.
- असे केल्याने आपले खाते सुरक्षित होईल आणि आपल्याशिवाय कोणीही आपल्या फेसबुक खात्यावर प्रवेश करू शकणार नाही.
- प्रथम फेसबुक सेटिंग्ज वर जाऊन सुरक्षा आणि लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनवर क्लिक करून ते एनेबल करा. आपली इच्छित २ एफए पद्धत निवडा आणि सेटअप पूर्ण करा.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jMBnr2