Full Width(True/False)

Alert! आधारकार्ड संबंधित 'या' दोन आवश्यक सर्विस केल्या बंद, UIDAI कडून माहिती

नवी दिल्लीः आधार कार्ड () आज भारतात राहणाऱ्या प्रत्येकांसाठी एक आवश्यक डॉक्युमेंट्स बनले आहे. जर आधार कार्डमध्ये थोडी जरी चूक असेल तर तुमचे काम थांबवले जाते. आधार कार्ड बनवणारी संस्था Unique Identification Authority of India (UIDAI) लोकांना आधार कार्ड संबंधित माहिती देत असते. आता ने आधार कार्ड संबंधित दोन सर्विस बंद करीत असल्याची माहिती दिली आहे. जाणून घ्या या दोन सर्विस संबंधी. वाचाः अॅड्रेस व्हॅलिटेशन लेटर संबंधित सर्विस झाली बंद UIDAI ने Address Validation Letter द्वारे Aadhaar Card मध्ये अॅड्रेस अपडेट करण्याची सुविधा बंद केली आहे. या प्रोसेसद्वारे भाडेकरू किंवा अन्य होल्डर सुद्धा आपला अॅड्रेस सहज अपडेट करीत होता. UIDAI ने आता आपल्या वेबसाइटवरून अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर संबंधित हा ऑप्शन सुद्धा हटवला आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार, अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरची सुविधा पुढील ऑर्डर येईपर्यंत बंद करण्यात आली आहे. परंतु, आता तुम्ही व्हॅलिड अॅड्रेस प्रूफसाठीच्या लिस्ट साठी (https://ift.tt/1KKve5a) वरून कोणताही एक अॅड्रेस प्रूफद्वारे आपला अॅड्रेस अपडेट करू शकता. ही सर्विस बंद करण्यात आल्याने याचा परिणाम त्या लोकांवर होईल. ज्यांच्याकडे अॅड्रेस बदलण्यसाठी आणकी काही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. वाचाः Aadhaar Card Reprint संबंधित सर्विस झाली बंद UIDAI ने आता लांब आणि रुंद आधार कार्डला रिप्रिंट करणे बंद केले आहे. आधी आधार कार्ड रीप्रिंटाचा फॉर्मेट काही वेगळा होता. UIDAI ने आता तो बदलला आहे. UIDAI आता PVC आधार कार्ड जारी करते. जे खूपच आकर्षक आहे. याची साइज एका डेबिट कार्ड इतकी छोटी आहे. हे नवीन कार्ड सहज आपल्या पॉकेट किंवा वॉलेट मध्ये बसते. आता ज्याला आधार कार्डला रीप्रिंट करणे UIDAI ने बंद केले आहे. ते साइज मध्ये खूपच मोठे होते. ट्विटरवर आधार कार्ड हेल्पलाइन (Aadhaar Help Centre) वर एका व्यक्तीने एक प्रश्न विचारल्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hjn2AU