Full Width(True/False)

मोठी बचत! Amazon सेलमध्ये स्मार्टफोनवर १०,००० पर्यंत डिस्काउंट तर लॅपटॉपवर ३५,००० पर्यंत ऑफर, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. Prime Day सेलचे आयोजन २६ ते २७ जुलै दरम्यान करण्यात आले आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन, लॅपटॉप व इतर प्रोडक्ट्सवर बम्पर सूट मिळविता येईल. Amazon ने आधीच सर्व स्मार्टफोन्सवर सवलत जाहीर केली आहे. प्रीमियम स्मार्टफोन आणि इतर गॅझेटवर देखील यात मोठ्या सवलतीत उपलब्ध असतील. वाचा: या प्रोडक्ट्सवर मिळणार सवलत यात प्रीमियम स्मार्टफोनवर १०,००० रुपये आणि लॅपटॉपवर ३५,००० रुपयांपर्यंत ऑफर देण्यात येणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम डेच्या विक्रीदरम्यान OnePlus, Xiaomi, Samsung, Apple, HP, boAt, Sony, Amazfit, Lenovo यासारख्या लोकप्रिय ब्रँडमधील वस्तूंवर देखील मोठी सूट देण्यात देईल.यात Amazon निवडक युजर्सना बँक ऑफर देईल. अशात जर तुम्ही एचडीएफसी बँक खातेदार असाल तर तुम्हाला एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर दहा टक्के त्वरित सूट मिळेल. तसेच, सेलमध्ये तुम्ही तुमचा जुना फोन देखील नव्याने बदलू शकता. Amazon प्रीमियमबरोबरच मिड-रेंज आणि बजेट स्मार्टफोनवर सवलत देत आहे. या सेलमध्ये iPhone 11, iPhone 12 Pro, OnePlus 9, OnePlus 9 Pro, Samsung Galaxy Note 20 अशा काहींचा समावेश आहे. स्मार्टफोनमध्ये OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10s, Samsung Galaxy M31s आणि बरेच Phones समाविष्ट आहेत. जर तुम्ही एखादा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. अ‍ॅमेझॉन विक्रीदरम्यान Boat Airdopes 441, OnePlus Buds Z, Sony WF-1000XM3 वर देखील डील्स मिळत आहे. Airdopes १९९९ मध्ये, OnePlus Z Buds २९९९ आणि Sony WF-1000XM3 १४,९९० मध्ये खरेदी करता येतील. Lenovo tab M10 FHD प्लस टॅब्लेट १४,९९९ रुपये, Lenovo Tab M8 ९४९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही Redmi 126 cm (50 inches) 4K Ultra HD Android Smart LED TV X50 ला ३६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Sony Bravia 138.8 cm (55 inches) 4K Ultra HD Certified Android LED TV ६९,९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. असा घेता येईल लाभ केवळ Amazon प्राइम सदस्यांनाच या सेलचाचा लाभ मिळेल. Amazon प्राइम सदस्यता ९९९ / वर्ष किंवा ३२९ रुपयात तीन महिन्यासाठी घेऊ शकता. त्याशिवाय १८-२४ वर्षांचे ग्राहकही मेंबरशिपवर यूथ ऑफर मिळवू शकतात आणि दोन निवडक योजनांच्या माध्यमातून ५० % सूट मिळवू शकतात. Amazon प्राईम सह, लोकप्रिय मोबाइल गेमवरील विनामूल्य आणि जलद वितरण, अमर्यादित व्हिडिओ, जाहिरातीशिवाय संगीत, विशेष सौदे, विनामूल्य इन-गेमचे फायदे मिळतात. वाचा: वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3exx2og