नवी दिल्ली : २५ जुलै ते २९ जुलै दरम्यान चालणार आहे. या दरम्यान ग्राहकांना अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट मिळेल. मेंबरसाठी हा सेल एक दिवस आधीच सुरू होईल. सेलमध्ये अनेक वस्तूंवर सूट मिळणार आहे. मात्र, फ्लिपकार्टने अद्याप सर्व डील्स आणि ऑफर्सची माहिती दिलेली नाही. बँकेच्या ग्राहकांना अतिरिक्त १०टक्के अतिरिक्त सूट मिळेल. वाचा: Poco X3 प्लसची सध्या किंमत २३,९९९ रुपये असून, सेलमध्ये फोन १७,२४९ रुपयात (आयसीआयसीआय बँक ऑफरसह) मिळेल. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. यात ६.६७ इंच फुल एचडी+ डिस्प्ले मिळतो. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासह क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. iPhone 12 Apple iPhone 12 ची किंमत ७७,९०० रुपये आहे. फ्लिपकार्टने अद्याप डिस्काउंटचा खुलासा केलेला नाही. आयफोन १२ मध्ये ६.१ इंच सुपर रेटिना डिस्प्ले मिळेल. तसेच. Apple ची ए१४ बायोनिक चिप देण्यात आली आहे. हा फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. सेलमध्ये आयफोन १२ मिनीवर देखील डिस्काउंट मिळेल. Xiaomi Mi 11 Xiaomi च्या एमआय ११ लाइट स्मार्टफोनची किंमत सध्या २३,९९९ रुपये असून, डिस्काउंटसह २०,४९९ रुपयात मिळेल. हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. वाचा: Infinix Note 10 Pro काही दिवसांपूर्वीच लाँच झालेला Infinix Note 10 Pro स्मार्टफोन १६,९९९ रुपयात उपलब्ध होईल. यात ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. हा फोन मीडियाटेक हीलियो जी९५ प्रोसेसर आणि ५००० एमएएच बॅटरीसह येतो. Samsung F62 या फोनमध्ये ६.७० इंच (१०८०x२४०० पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर Samsung Exynos ९८२५ SoC प्रोसेसर मिळतो. यात रियरला ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, दुसरा १२ मेगापिक्सल, तिसरा ५ मेगापिक्सल आणि चौथा ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. या फोनची कंमत २३,९९९ रुपये असून, सेलमध्ये डिस्काउंट मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BixksW