Full Width(True/False)

Redmi Note 10T 5G: शाओमीचा स्वस्त ५जी स्मार्टफोन भारतात लाँच, फोनवर १ हजाराचा डिस्काउंट

नवी दिल्लीः शाओमीने भारतीय बाजारात रेडमी सीरीजचा पहिला ५जी फोन लाँच केला आहे. हा भारतातील सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन पैकी एक आहे. या फोनची किंमत १४ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीने इंट्रोडक्टरी प्राइसची घोषणा केली आहे. नंतर याच्यात वाढ होऊ शकते. या फोनध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः फोनची किंमत आणि ऑफर्स रेडमी नोट १० टी ५जी ला दोन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. याच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. या किंमतीत Poco M3 Pro 5G फोन सुद्धा लाँच करण्यात आला होता. फोनवर HDFC बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय वर १ हजार रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट दिला जाणार आहे. या फोनची विक्री २६ जुलै पासून सुरू होणार आहे. अॅमेझॉन इंडिया आणि शाओमीच्या वेबसाइटवरून फोन खरेदी करता येवू शकतो. वाचाः Redmi Note 10T 5G चे फीचर्स रेडमी नोट १० टी ५जी स्मार्टफोनला चार कलर मध्ये लाँच करण्यात आले आहे. हे मॅटेलिक ब्लू, मिंट ग्रीन, क्रोमियन व्हाइट आणि ग्रेफाइट ब्लॅक मध्ये मिळेल. फोनमध्ये ६.५ इंचाचा IPS डिस्प्ले दिला आहे. हे डिस्प्ले फुलएचडी+ रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. यात ५जी स्पोर्टचा MediaTek Dimensity 700 प्रोसेसर मिळतो. फोनमध्ये ६ जीबी रॅम पर्यंत आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. कॅमेरात Night Mode, SlowMo, Colour Focus, Pro colour सारखे मोड दिले आहेत. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन ३.५ एमएम हेडफोन जॅक यूसीबी टाइप सी पोर्ट आणि ड्युअल सिम सपोर्ट सोबत येतो. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UwX4RH