नवी दिल्ली. मागील वर्षी नोव्हेंबरच्या उत्तरार्धात स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. पण, भारतात मात्र या पोको स्मार्टफोनने फेब्रुवारी २०२१ मध्ये एन्ट्री केली. आता पाच महिन्यांनंतर कंपनीने लाँच झालेल्या या हँडसेटच्या किंमतीत वाढ केली आहे. Poco M3 चा नवीन रॅम वेरियंट देखील सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सॅमसंग, शाओमी, व्हिवो आणि ओप्पो यासारख्या कंपन्यांनी देखील त्यांच्या काही स्मार्टफोनच्या किंमती अलीकडेच वाढवल्या आहेत. वाचा: Poco M3 स्मार्टफोन देशात आत्तापर्यंत ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध होता. परंतु आता हे हँडसेट ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्येही उपलब्ध असेल. नवीन व्हेरिएंटची किंमत १०,४९९ रुपये आहे. दोन्ही जुने व्हेरिएंट्स अनुक्रमे १०,९९९ आणि १२,४९९ रुपयात ५०० रुपयांच्या वाढीसह उपलब्ध असतील. पूर्वी हे व्हेरिएंट १०,४९९ आणि ११,९९९ रुपयात उपलब्ध होते. अलीकडेच कंपनीने हे सांगितले होते की, Poco M3 देशभरात प्रचंड यश मिळाले आहे. आणि पहिल्या विक्रीमध्ये या ब्रँडने १,५०,००० युनिट्सची विक्री केली तर १० दिवसांपेक्षा कमी कालावधीत एकूण २,५०,००० युनिट्स विकल्या गेल्या. रिलीझ झाल्यापासून या पोको हँडसेटच्या ७,५०,०००हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. Poco M3 स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर आहे. हँडसेटमध्ये ६००० mAh लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी आहे. पोकोच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सल प्रायमरी,२ मेगापिक्सेल सेंसरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटचे वजन १९७ ग्रॅम आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z9e7b8