मुंबई- 'बिग बॉस १४' मधून लोकप्रियता मिळवणारा गायक आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. 'बिग बॉस' नंतर चाहत्यांना राहुल आणि दिशाच्या लग्नाचे वेध लागले होते. चाहते सतत राहुल आणि दिशाला याबाबत विचारणा करत होते. अखेर चाहत्यांची उत्कंठा आणखी न ताणता राहुल आणि दिशाने त्यांच्या लग्नाची घोषणा केली आहे. चाहते या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर तो दिवस आला आहे. दिशा आणि राहुलने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा केली आहे. राहुल आणि दिशाने त्यांच्या लग्नाची घोषणा करत चाहत्यांना जणू सुखद धक्का दिला आहे. त्यांच्या लग्नाची बातमी वाचून राहुल आणि दिशा दोघांचेही चाहते प्रचंड आनंदित झाले आहेत. चाहत्यांनी दिशा आणि राहुलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राहुल आणि दिशा १६ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाची तारीख चाहत्यांसोबत शेअर करत राहुल आणि दिशाने लिहिलं, 'आमच्या कुटुंबाच्या शुभ आशीर्वादासह ही गोष्ट तुम्हाला सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय. येत्या १६ जुलै रोजी आमचा शुभ विवाह आयोजित करण्यात आला आहे. आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करत असताना आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि शुभेच्छांची गरज आहे.' ही पोस्ट शेअर करत राहुलने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'TheDisHulWedding' राहुलच्या या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच 'खतरों के खिलाडी ११' मधील वरुण सूद आणि दिव्यांका त्रिपाठी यांनीही राहुलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल आणि दिशा नेहमीच वैदिक पद्धतीने लग्न करू इच्छित होते. त्यांच्या लग्नाला घरातल्यांसह काही खास पाहुण्याची उपस्थिती असावी अशी माहिती स्वतः राहुलने दिली होती. आता चाहत्यांना राहुल आणि दिशाच्या लग्नाच्या दिवशीची उत्सुकता लागून राहिली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2V6vQBj