Full Width(True/False)

कट म्हटल्यावरही किस करत राहिलेले रणवीर- दीपिका

मुंबई- अभिनेत्री आणि अभिनेता बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त लोकप्रिय असणाऱ्या जोड्यांपैकी एक आहे. मोठ्या पडद्यावर असो किंवा खऱ्या आयुष्यात दीपिका आणि रणवीरला एकत्र पाहणं चाहत्यांना प्रचंड आवडतं. आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या या दोन्ही कलाकारांची प्रेम कहाणीदेखील त्यांच्याप्रमाणेच हटके आहे. लग्नापूर्वी दीपिका आणि रणवीर एकमेकांना डेट करत होते. '' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी असं काहीतरी केलं ज्यामुळे त्यांचं प्रेम फार काळ लपून राहू शकलं नाही. 'रामलीला' चित्रपटाच्या टीममधील सदस्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील 'अंग लगा दे' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान रणवीर आणि दीपिका यांचा किसिंग सीन होता. त्यापूर्वी दीपिका आणि रणबीर यांच्यातील प्रेमाची जाणीव सगळ्यांनाच होत होती. परंतु, त्या सीन दरम्यान दीपिका आणि रणवीर एकमेकांत इतके गुंतून गेले की दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी कट म्हटल्यानंतरही ते एकमेकांना किस करत राहिले. हे पाहून तिथे उपस्थित सगळेच अवाक झाले होते. तर रणवीर आणि दीपिका स्वतःदेखील घडलेल्या घटनेने चकित झाले होते. टीमच्या सदस्याने सांगितल्याप्रमाणे, तेव्हा रणवीर आणि दीपिका एकमेकांना आवडू लागले होते. ते एकमेकांना बेबी म्हणून हाक मारायचे सोबत जेवायचे. जेव्हा चित्रीकरण नसायचं तेव्हा ते दोघेही त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन मधून गायब असायचे. 'रणवीर- दीपिका यांनी सोबत अनेक चित्रपटात काम केलं. २०१३ साली आलेला 'रामलीला' हा त्यांच्या पहिला चित्रपट होता. त्यानंतर 'फायडिंग फेनी', 'बाजीराव- मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटात ते एकत्र झळकले आहेत. २०१८ साली इटली येथे लग्नगाठ बांधत रणवीर- दीपिकाने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jOyW7A