नवी दिल्ली : ५००० एमएएच बॅटरी आणि ६ जीबी रॅमसह येणारा शानदार फोन खरेदी करायचा असाल तर ओप्पोच्या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर आहे. स्मार्टफोनवर तुम्हाला ३५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या फोनमध्ये ४ रियर कॅमेरे देखील देण्यात आले आहे. या फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया. वाचा: किंमत आणि ऑफर फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येतो. फोनला १६,९९० रुपयात लाँच करण्यात आले होते. मात्र, आता अॅमेझॉन इंडियावर १४,९९० रुपयात उपलब्ध आहे. एवढेच नाही तर आणि च्या क्रेडिट कार्ड ईएमआयवर १५०० रुपये इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल. म्हणजेच, या फोनवर एकूण ३५०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. वाचा: Oppo A52 चे स्पेसिफिकेशन्स स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुल एचडी+ रिझॉल्यूशन आणि पंच-होल कटाउटसोबत येतो. यामध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेज २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर सपोर्ट मिळतो. हा फोन अँड्राइड १० वर आधारित ColorOS ७.१ वर काम करतो. फोन काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायासोबत येईल. फोटोग्राफीसाठी यामध्ये ४ रियर कॅमेरे देण्यात आले आहे. यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर मिळतो. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. ओप्पोच्या या फोनमध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dEGIg9