Full Width(True/False)

'तुझी नवीन आई आली' जेव्हा शाळेत अर्जुनला चिडवायचे मित्र

मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता यांनी पहिली पत्नी आणि अभिनेता अर्जुन कपूरची आई मोना सूरी कपूरला घटस्फोट देत अभिनेत्री यांच्याशी लग्न केलं होतं. पण यामुळे अर्जुनच्या शालेय जीवनावर फार गंभीर परिणाम झाले होते. या काळात तो फार तणावात होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्जुननं त्याच्या शाळेच्या दिवसांतील आठवणी शेअर करताना कशाप्रकारे त्याचे खास मित्रही त्याला 'नवीन आई' श्रीदेवी यांच्याबद्दल विचारत असत हे सांगितलं. एका हिंदी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'मी वैयक्तीक दुःख, मनावरील आघात आणि अनेक चढ-उतारातून गेलो आहे. जेव्हा मी मोठा होत होतो तेव्हा माझ्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला. मला त्या तणावातून जावं लागलं आहे. माझे वडील एक प्रसिद्ध व्यक्ती होते आणि ज्या महिलेसोबत त्यांनी लग्न केलं ती त्यावेळची भारतातील सर्वात मोठी सुपरस्टार असल्यानं तो काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता.' अर्जुन कपूर पुढे म्हणाला, 'आई- वडिलांचा घटस्फोट आणि त्यानंतपर वडिलांनी केलेलं दुसरं लग्न हे माझ्यासाठी सोपं नव्हतं. त्यावेळी शाळेत माझे खास मित्र देखील मला माझ्या नव्या आईच्या नावानं चिडवत असतं. नवीन आई आल्यावर कसं वाटतं? असं विचारत असत. जेव्हा शालेय वयात अशा गोष्टी घडतात तेव्हा तुम्ही अधिकच संवेदनशील होता. हेच वास्तव आहे आणि मी या सर्व गोष्टींशी लढत आहे.' बोनी कपूर यांनी मोना सूरी यांच्याशी १९८३ साली लग्न केलं होतं आणि या दोघांचा १९९६ साली घटस्फोट झाला. या दोघांना अर्जुन आणि अंशुला अशी दोन मुलं आहेत. मोना यांना घटस्फोट दिल्यानंतर १९९६ सालीच बोनी कपूर यांनी सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यानंतर अर्जुन कपूर आणि बोनी कपूर यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले होते. पण श्रीदेवी यांचं २०१८ साली निधन झाल्यानंतर मात्र अर्जुननं वडील आणि श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी यांना मोठ्या भावाच्या नात्यानं आधार दिला होता. अर्जुन कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर तो लवकरच 'एक विलन २' आणि 'भूत पुलिस' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याआधी त्याचे 'संदीप और पिंकी फरार' आणि फिल्म 'सरदार का ग्रँडसन' हे चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36byYyg