मुंबई- अश्लील व्हिडीओ बनविल्या प्रकरणी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री हिचा पती आणि उद्योजक याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नुकतीच राजच्या कोठडीत वाढ करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सोशल मीडियावर शिल्पालादेखील ट्रोल केलं जातंय. परंतु, एकाही बॉलिवूड कलाकाराने शिल्पाच्या समर्थनार्थ पोस्ट न केल्याने बॉलिवूड दिग्दर्शक यांनी रोष व्यक्त केला आहे. अनेक ट्वीट करत त्यांनी शिल्पाची बाजू उचलून धरत बॉलिवूड कलाकारांना सुनावलं. जर तुम्ही शिल्पासोबत उभं राहू शकत नाही तर तिला एकटीला राहू द्या, असं हंसल मेहता यांनी म्हटलं आहे. बॉलिवूड कलाकारांवर साधला निशाणा हंसल यांनी ट्वीट करत लिहिलं, 'जर तुम्ही शिल्पाच्या सोबत उभे राहू शकत नाही, तिची साथ देऊ शकत नाही तर निदान तिला एकटीला राहू द्या आणि या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय येऊ द्या. तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि मर्यादेचा आदर करा. हे खूप चुकीचं आहे की न्याय मिळण्यापूर्वीच लोकांना दोषी म्हटलं जातं.' बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधत हंसल यांनी लिहिलं, 'शांत राहणं आता पॅटर्न झाला आहे. चांगल्या वेळी सगळे तुमच्यासोबत पार्टी करण्यासाठी हजर असतात. वाईट वेळेस सगळे शांत राहणं पसंत करतात. पूर्णपणे एकटं पाडलं जातं.' हंसल मेहता यांनी मीडिया रिपोर्टवर ओढले ताशेरे शिल्पाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सातत्याने लिहिणाऱ्या आणि तिला दोषी ठरवणाऱ्या मीडिया रिपोर्टवरदेखील हंसल यांनी ताशेरे ओढले. हंसल यांनी लिहिलं, 'मानहानी करण्याचा हा एक पॅटर्न आहे. एखादी व्यक्ती जर चित्रपटसृष्टीशी जोडली आहे तर सगळ्यात आधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लिहा. त्यांच्याबद्दल पूर्वीपासूनच मनात मत बनवून घ्या. त्याची समाजातील प्रतिमा डागाळली जाईल याची काळजी घ्या. बातम्यांमधे फक्त वाईट गोष्टी दाखवा. हे सगळं केल्याने एका व्यक्तीची संपूर्ण प्रतिष्ठा मातीमोल होते.' अशा शब्दात हंसल यांनी शिल्पाच्या समर्थनात ट्वीट केले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ltPQJB